कोकण

''पीएम सूक्ष्म अन्न उद्योग''साठी पुढाकार

CD

३ (टुडे पान २ साठी )

''पीएम सूक्ष्म अन्न उद्योग''साठी पुढाकार

खेडमध्ये ३५ जणांचे प्रस्ताव ; २१ जणांना कर्ज मंजूर
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडण्याकरिता तालुक्यातील २० गावांतील ३५ लाभार्थ्यांनी उद्योगनिर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग योजनेंतर्गत १२ प्रकारच्या उद्योग प्रकल्पांकरिता विविध बँकांकडे अर्थसाहाय्यासाठी मागणी केली असून, २१ जणांना सुमारे २ कोटी १२ लाखांचे प्रकल्प कर्ज मंजूर झाले तर १४ जणांचे कर्ज प्रक्रियेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी वयोमानानुसार शेतीकडे दुर्लक्ष केल्याने हजारो हेक्टर जमीन ओस पडू लागली आहे. तालुक्यातील शेतकरी, बेरोजगार युवक व महिलांना शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असल्याने शेतीशी निगडित उद्योग उभारणीसाठी प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. खेडसह उधळेबुद्रुक, आवाशी, अस्तान, सुकिवली, शिरवली, चिंचवली, खवटी, चाटव, भरणे, खोपी, सुकदर, नातूनगर, आंबडस, तिसंगी, आंबवली, मुंबके, तळे, शेल्डी, चिंचघर आदी २० गावांतील ३५ जणांनी पापड, बेकरी, भाजीपाला व फळे, काजू, दुग्ध, आंबा, तेलबिया, मसाला, भात, आईस्क्रीम भाजीपाला निर्जलीकरण यासारख्या १२ प्रकारच्या उद्योग प्रक्रियांसाठी पुढाकार घेतला आहे.
या उद्योगांसाठी अर्थसाहाय्य खेड, चिपळूण, खवटी, आंबवली, दापोली, दाभिळनाका, कर्जी आदी ठिकाणच्या विविध बँकांनी केले आहे. तालुक्यातील ३५ लाभार्थ्यांत आवाशी, सुकिवली, शिरवली, भरणे, सुकदर, नातूनगर, तळे, मुंबकेतील ८ महिलांचादेखील सहभाग आहे. २१ जणांचे २ कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले असून, उर्वरित १४ जणांचे कर्ज प्रकरण मंजुरी प्रक्रियेत असल्याचे समजते.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनचा संताप; थेट IPL वरच फोडलं खापर, म्हणाला...

EV Policy: पेट्रोल-डिझेल वाहनांना झटका! दिल्लीत नवे EV धोरण लागू; सरकार भरघोस प्रोत्साहन देणार, काय फायदा होणार?

Latest Marathi News Live Update: कोर्टाने नवीन उदाहरण समोर आणलं आहे- मुख्यमंत्री

Ayodhya Ram Mandir: चंपत राय चौकशीच्या फेऱ्यात, चोरी प्रकरणानंतर बदलणार कारभाराची रचना? CEO-सचिव पदांसह मोठ्या फेरबदलाची तयारी"

SCROLL FOR NEXT