कोकण

जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सई प्रभुदेसाई विजेती

CD

१४ (टुडे पान २ साठी)


-rat१४p१८.jpg-
२४M८३५६५
रत्नागिरी : क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त खेळाडू
--------
सई प्रभूदेसाईला क्लासिकल बुद्धीबळचे विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे आयोजित (कै.) मीरा वासुदेव सावंत स्मृती १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाईने पटकावले. सईने अपराजित राहत साडेपाच गुणांसह निर्विवाद प्रथम स्थान प्राप्त केले.
स्वीस लीग पद्धतीने सहा फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत राजरत्न व्हनकटे, आयुष रायकर व रुमिन वास्ता या तिघांनीही साडेचार गुण प्राप्त केले. सरस टाय ब्रेकच्या आधारावर राजरत्नने उपविजेतेपद प्राप्त केले. आयुषने तृतीय क्रमांक पटकावला, तर रुमीनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रत्येकी चार गुण मिळवीत मिहीर काणेकर व कौस्तुभ हर्डीकर यांनी अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक पटकावला. निधी मुळ्ये हिने साडेचार गुणांसह मुलींमध्ये सर्वोत्तम उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले, तर अनरेटेड खेळाडूंचे प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ज्योतिरादित्य गडाळे याने पटकावले. १५ वर्षांखालील वयोगटात मंडणगडचा हर्ष चव्हाण, १२ वर्षांखालील वयोगटात आर्या पळसुलेदेसाई तर ९ वर्षांखालील वयोगटात विहंग सावंत यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण (कै.) मीरा सावंत यांचे नातू व आस्था प्रतिष्ठानचे (मुंबई) सुयोग सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अॅड. कल्पलता भिडे, कीर्ती मोडक, सुहास कामतेकर, श्रीपाद मोडक, मंगेश मोडक, सुभाष शिरधनकर, चैतन्य भिडे आदी उपस्थित होते. सुयोग सावंत यांनी अशा क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरीमध्ये सातत्याने भरवल्या जात असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. रत्नागिरी जिल्हा विकास बुद्धिबळ कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेली ही पाचवी क्लासिकल स्पर्धा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT