कोकण

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

CD

२९ (टुडे पान २ साठी)

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सतेश घाणेकर यांचा मृत्यू ; पत्नीची पोलिसांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ११ : रस्त्यावरील केबलच्या मारामुळे असगोली येथे दुचाकी अपघात मृत्यू झालेल्या सतेश घाणेकर यांची पत्नी वैष्णवी घाणेकर यांनी सदर अपघाताला कारणीभूत असलेला वाहनचालक व केबल उभारणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुहागर पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
श्रीमती वैष्णवी घाणेकर यांनी पोलिसांना याबाबत निवेदन दिले आहे. असगोली येथील सतेश घाणेकर (वय ३८) हे १८ एप्रिलला सायंकाळी मुलगा श्रीवांश घाणेकर व पांडुरंग घर्वे यांच्यासह गुहागर येथून दुचाकीवरून असगोली येथील आपल्या घरी येत होते. या मार्गावर असगोली मधलीवाडी येथे समोरून एक सहाचाकी ट्रक भरगाव वेगाने गुहागरच्या दिशेने येत होता. असगोली मधलीवाडी येथे ग्रामपंचायत येथे जाणारी महानेट कंपनीची वायफायची केबल वायर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खांबावर बऱ्याच दिवसांपासून खूप खाली लोंबकळत होती. ही लोंबकळणारी वायर भरधाव येणाऱ्या ट्रकच्या वरच्या बाजूला अडकून ताणल्याने तुटली. मात्र सदर केबल दुचाकीवरून प्रवास करणारे सतेश घाणेकर यांच्या दुचाकीवर आदळली. यामुळे दुचाकीचा भीषण अपघात घडला. यामध्ये जखमी सतेश घामेकर यांचे उपचारादम्यान मृत्यू झाला. ४ वर्षाचा माझा मुलगा श्रीवांश, पांडुरंग घर्वे हे गंभीर जखमी असून अजूनही ते उपचार घेत आहे. या अपघातामुळे कुटुंबाचा आधारच हरपला असून कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे अपघाताला व पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या टॅकचालक व मालक, महानेट कंपनी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT