कोकण

पावसाळा आला तरी महामार्गाचे काम ४० टक्केच

CD

rat14p7.jpg
83517
रत्नागिरी- खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ सुरू असलेले मिऱ्या-नागपूर महामार्गाचे खोदाईचे काम.
-----------
महामार्गा चौपदरीकरणाचे
काम अद्याप ४० टक्केच
पावसाळ्यात वाहनधारकांची होणार कसरत
रत्नागिरी, ता. १४ : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. हातखंबा ते साळवी स्टॉप त्यापुढे पाली ते मलकापूर हे काम सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला तरी ४० टक्के कामही झालेले नाही. यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. मिऱ्यापासून चौपदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मिऱ्या, साळवी स्टॉप, कुवारबाव कारवांचीवाडी, खेडशी, हातखंबा, पाली, नाणीज, साखरपा, आंबा घाटचे काम सध्या सुरू आहे. आंबा घाटही एका बाजूने कटिंग करण्यात आला आहे. साधारण डिसेंबरनंतर या कामाला सुरवात झाली. मोठी झाडे तोडल्यानंतर रुंदीकरण व रस्ता कटाई कामाला प्रारंभ झाला.
येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू येणार आहे. त्याअनुषंगाने कंपनीने पावले टाकण्याची गरज आहे. परंतु याबाबत कंपनी उदासीन असल्याचे दिसते. मोठे मातीचे ढिग करून मातीचे रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल होवून अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष पाऊस पंधरा दिवसांवर देऊन ठेपला तरी कंपनीने याबाबत कोणतीही खबरदारी घेतलेली दिसून येत नाही. साळवी स्टॉप ते हातखंबा या दरम्यान सर्व माती रस्त्यावर आली आहे. यामुळे सध्या या मार्गावरून गाडी चालवणे कठीण झाले आहे. प्रमाणापेक्षा पाण्याचा वापर जास्त केला जात असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

चौकट
पावसाळ्यात आंबा घाट धोकादायक
आंबा घाटाचे काम जोरदार सुरू आहे. एका बाजून डोंगर कापला जात आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी हे काम झाले नाही तर सगळी माती रस्त्यावर येणार आहे. यामुळे आंबा घाटातील वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. गतवर्षी तर तब्बल महिनाभर आंबा घाट बंद होता. यावेळी वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT