कोकण

मंडणगड -निवासी गृहप्रकल्पांचे सांडपाणी रस्त्यात

CD

rat14p15.jpg, rat14p16.jpg
83560, 83561
मंडणगड : शहरात राष्ट्रीय महामार्गालगत गटारातील सांडपाण्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती.
-----------
निवासी गृहप्रकल्पांचे सांडपाणी रस्त्यात
आरोग्य धोक्यात ; नगरपंचायतीकडून कठोर कारवाईची अपेक्षा
मंडणगड, ता. १४ः सांडपाणी व्यवस्थापनाच्या मुद्यांवर मंडणगड नगरपंचायत पूर्णपणे अपयशी ठरली आहे. स्वच्छतेसाठी वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा निधी खर्च करुनही सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या वेळोवेळी डोके वर काढते व त्यावर यंत्रणेकडे उत्तर नाही. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेली गटारे तोकडी व शून्य नियोजनाची असल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरुन वाहते. याशिवाय सर्व गटरांचा शेवटच्या हा शहरातील लहान ओढ्यांच्या माध्यमातून निवळी नदीकडे होत असल्याने सांडपाण्यामुळे पिण्याचे पाण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होण्याची भिती नागरीक व्यक्त करीत आहेत.
जलस्त्रोतांच्या विहीर असलेल्या भागात सांडपाण्याचे निचरा होऊ नये याकरिता नागरीक आग्रही असल्याने या पाण्याचा यथायोग्य व्यवस्थापन होत नाही. मे महिन्यात सांडपाण्याच्या दुर्गंधीने शहराच्या बकालीकरणात आणखीनच भर टाकली आहे. शहरात डासांचे बारमाही अस्तित्वही गेल्या काही वर्षांपासून जाणवत आहे. निमशहरी मंडणगडची नैसर्गित संरचना डोंगर उताराची आहे. गेल्या दोन दशकात शहरातील लोकसंख्या नव्या गृहप्रकल्पामुळे वाढली आहे. शहरात बांधकामे करताना नागरिक व बिल्डर्स बांधकामाच्या नियमाकडे डोकेझाक करुन आपल्याकडील शंभर टक्के जागेचा वापर करतात. त्यामुळे पाण्याचा निचराच होत नाही. याकडे वेळोवेळीचे सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही दुर्लक्ष केल्याने समस्येची तीव्रता वाढली आहे. परकार कॉम्पलेक्स, परिवार पार्क या ठळक उदहारणासह अपवाद सोडल्यास नागरिकांचे व सोसायट्यांचे सांडपाण्याचे नियोजन नेहमीच वादाचा विषय ठरले आहेत. नगरपंचायतीस कर भरत असल्याने सांडपाण्यासाठी गटारे बांधणे व सांडपाणी शहराबाहेर सोडणे हे नगरपंचायत काम असल्याची बतावणी सगळेच करीत आहेत. दुसरीकडे नगरपंचायतीने आपली बहुतांश ताकद याकामी खर्च केल्यानंतरही समस्या संपली नाही. नागरिकांनी बांधकामाचे नियम न पाळल्याने याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापनाकडे निवासी प्रकल्पातील सोसायट्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक गृहप्रकल्पाचे पाणी रस्त्याच्या शेजारी अथवा रस्त्यावर गटार गंगा म्हणून वहात आहे. त्याचे नियोजन करण्याबरोबरच कायदे न मानणाऱ्या व पूर्ण शहराचे आरोग्य वेठीस धरणाऱ्या प्रत्येक समाज घटकाविरोधात कठोर कारवाईची गरज असून समस्याग्रस्त नागरिक तशी मागणी करीत आहेत.
----------
चौकट
नगरपंचायत निर्मितीनंतरही परिस्थिती जैसे थे
स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाकरिता तत्कालीन ग्रामपंचायत आपल्या उत्पन्नातील सर्वाधिक पैसे खर्च करत असते. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. कारभारात अपेक्षित गुणात्मक बदल अद्याप झालेले नाहीत. विकास आरखाडा नसल्याने ग्रामपंचायतीसारखेच रस्ते, पाखाड्या, संरक्षक भिंती व गटारे वा पायाभूत सुविधांच्या निर्मितीपलीकडे कामाचे अस्तित्व दिसून येत नाही. स्थापनेच्या दहा वर्षानंतरही नगरपंचायतीचे अस्तित्व ग्रामपंचायतीप्रमाणेच आहे.
----------
चौकट
सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ कधी संपणार? नागरिकांनी निवडून दिलेल्या नगरसेवक याकडे गांभीर्याने पाहणार की नाही ? सामान्य नागरिकांनी कायदा हातात घेऊन यावर कृती करण्याची संबंधित यंत्रणा वाट पाहत आहे असे दिसते.
- गोविंद नार्वेकर, त्रस्त नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT