कोकण

देशात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण

CD

83629
वागदे : येथील गोपुरी आश्रमातील शिबिरात बोलताना डॉ.सुरेंद्र मोहन. शेजारी डॉ. राजेंद्र मुंबरकर, बाबासाहेब नदाफ आदी.


देशात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण

डॉ.सुरेंद्र मोहन : गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१५ : देशातील धार्मिक, जातीय ध्रुवीकरण टोकाला पोचले आहे, अशावेळी देशाच्या भवितव्याचा विचार करून राष्‍ट्रसेवा दल माणसामाणसातील मानवता टिकवून ठेवण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन वात्सल्य मंदिर ओणीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी केले.
कणकवली लगतच्या वागदे गोपुरी आश्रम येथे राष्‍ट्र सेवादलाच्या व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिराचे उद्‍घाटन डॉ. सुरेंद्र मोहन यांनी केले. यावेळी साने गुरुजींच्या प्रतिमेला राष्‍ट्र सेवा दलाचे राष्‍ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमावेळी अद्वैत फाउंडेशनच्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्यासह भानू गोंडाळ, मालती गोंडाळ, हरिश्चंद्र सरमळकर, संगीता सरमळकर, विद्या राणे, अर्पिता मुंबरकर, मुख्य प्रशिक्षक चंदन माटुंगे, प्रशिक्षक सागर पाटील, राज कांबळे, विश्वास राशिवडे आदी उपस्थित होते.
डॉ. महेंद्र मोहन म्हणाले, की राष्‍ट्रसेवा दल आणि अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रम येथे सलग ७ वर्षे मोफत व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. राष्ट्र सेवा दल ही बिन भिंतीची शाळा आहे. या शाळेमध्ये लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित राष्ट्रवादाचे मूल्ये शिबिरार्थींवर रुजविण्याचे काम केले जाते. यातूनच भारताची उद्याची सजग नागरिकांची पिढी घडणार आहे. प्रा. डॉ. मुंबरकर म्हणाले, की गोपूरी आश्रमाच्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचा विचार तसेच महात्मा गांधी, आणि कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे समानतेचे विचार नव्या पिढीसमोर देण्याचे काम आम्ही करत आहोत. राजन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. भानू गोंडाळ यांनी सूत्रसंचालन केले. विद्या राणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT