कोकण

लोकसभा निवडणुकीत ‘एसटी’ मालामाल

CD

83643
कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस आरक्षित केल्या होत्या.


लोकसभा निवडणुकीत ‘एसटी’ मालामाल

४९ लाखांचे उत्पन्न ः कर्मचाऱ्यांना सेवा, माल वाहतूक ट्रकचाही वापर

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने एस.टी. प्रशासनाच्या १२० बसेस आणि १७ मालवाहू ट्रक वापरण्यात आले. त्‍यामधून एस.टी महामंडळाला ४९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
रत्‍नागिरी-सिंधुदुर्गात ७ मे रोजी मतदान झाले. तत्‍पूर्वी ६ मे रोजी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथून निवडणूक पथकांना मुख्यालयापासून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविणे आणि ७ मे रोजी मतदान केंद्रापासून पुन्हा मुख्यालयापर्यंत संबंधित पथकांना आणणे यासाठी एस.टी. महामंडळाने १२० बसेस आणि १७ मालवाहू ट्रकची व्यवस्था केली होती.
या सर्व गाड्यांच्या भाड्यापोटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला शासनाकडून सुमारे ४९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे, यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली होती. तसेच साहित्य वाहतुकीसाठी मालवाहू ट्रकचा वापरही करण्यात आला होता. दरम्‍यान, मोठ्या संख्येने निवडणूक कार्यक्रमासाठी एस.टी. बस आरक्षित झाल्‍याने जिल्हांतर्गत वाहतूक विस्कळीत झाली होती. ६ मे रोजीच्या बहुतांश रात्रवस्ती फेऱ्या रद्द करण्यात आल्‍या होत्या. त्‍यामुळे गावातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT