कोकण

बालमित्र-मैत्रिणींच्या भेटीने पाणावले डोळे

CD

83659
ओटवणे ः येथे स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आलेले माजी विद्यार्थी.


बालमित्र-मैत्रिणींच्या भेटीने पाणावले डोळे

ओटवणेत रंगला स्नेहमेळावा ः रवळनाथ विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी.


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर, ओटवणेचा २००४ दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा त्याच दहावीच्या खोलीत नुकताच पार पडला. तब्बल २४ वर्षांनंतर शाळेत पुन्हा एकदा बेंचवर बसून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा साजरा केला. एकत्र आलेल्या सर्व बालमित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. आनंदाच्या वातावरणात गुरुवर्यांनी कशाप्रकारे घडवले आणि आज आपण कुठपर्यंत आहोत, याचेही सर्वांनीच शिक्षकांच्या सान्निध्यात दिवस घालवून आभार व्यक्त केले.
गुरुजनांनी दिलेली शिकवण, आदर्श यामुळेच आज प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी चांगले जीवन जगत असल्याबाबतचा प्रत्येकाचा अनुभव ऐकून शिक्षकांचेही डोळे भरून आले. ओटवणे येथे श्री रवळनाथ विद्यामंदिरचे रोपटे (कै.) दामले काका यांनी लावले आणि त्यानंतर त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले. या आनंदाच्या क्षणी आनंदाने प्रत्येकजण भावूक झाला. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. देसाई व इतर सहकारी शिक्षकांनीदेखील २००४ च्या दहावीच्या वर्गात त्यावेळी आणि आज कोणत्याप्रकारे काम चालते तसेच विद्यार्थी घडविणे हेच आमचे ध्येय असून, प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेशी आपली नाळ कायमच जोडून ठेवावी, असे सांगितले. हा ओटवणे शाळेतील पहिला स्नेहमेळावा असून, या सर्व विद्यार्थ्यांकडे बघून एक आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे श्री. कांबळे, श्री. राऊळ, श्री. धोंगडे, श्रीमती सावंत या शिक्षकांनी मनोगतामध्ये सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांपैकी २००४ च्या बॅचमधील सुमारे २५ विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी १० वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारनंतरही चालू होता. सायंकाळी समारोपाने या कार्यक्रमाची सांगता झाली. दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यास आलेल्या २००४ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी आपल्याला शिकवल्याचे आणि आज आपण कसे घडलो, याचे वर्णन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT