कोकण

चिपळूण ःवहाळ फाट्यावरील उड्डाणपुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू

CD

ratchl१४५.jpg-
83658
चिपळूणः वहाळफाटा येथील सुरू झालेला उड्डाणपूल.
---------------
वहाळ फाट्यावरील उड्डाणपुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू
आगवेतील काही भागात होणार डांबरीकरण; पेढेतील एक मार्गिका लवकरच मार्गी
चिपळूण, ता. १४ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला वहाळ फाटा येथील उड्डाणपूल सोमवारपासून दुतर्फा वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पेढेतील रखडलेल्या एका मार्गिकेचे कामही पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाणार आहे.
महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किमी दरम्यानच्या चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहाद्दूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत सुमारे पावनेदोनहून अधिक किमीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. एकूण ४६ पिलरवर उभ्या राहणाऱ्या या पुलाचा काही भाग गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कोसळल्यानंतर पूल उभारणीचे काम थांबवले आहे.
चिपळूण टप्प्यामध्ये शहरातील उड्डाणपूल वगळता पेढे फरशी तिठा आणि वहाळफाटा येथील कामे सुरू होती. यातील वहाळफाटा येथील साडेतीनशे मिटर उड्डाणपुलाची एक मार्गिका काही दिवसांपासून वाहतुकीस खुली केली होती, तर दुसरी मार्गिका सोमवारी सुरू केल्याने आता या पुलावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू झाली असली तरी अजूनही किरकोळ कामे शिल्लक असून ती सुरू आहेत. या पुलाच्या पुढील आगवेकडील बाजूस ५० मीटरचा रस्ता हा तेथील वादामुळे पूर्णपणे थांबला आहे. प्रांताधिकारी पातळीवर येथे चर्चा करून काम सुरू करण्याची प्रकिया आहे. मात्र तरीही त्यामध्ये यश न आल्यास हा शिल्लक भाग डांबरीकरण करून पावसाळ्यासाठी तयार करण्यात येणार आहे. पेढे फरशी तिठा येथील एक मार्गिका वाहतुकीस यापूर्वी खुली करण्यात आली असून दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. तेथे आवश्यक तो माता भराव आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू असून ही मार्गिकाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे महामार्ग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT