कोकण

-दापोलीत सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा

CD

४३ (पान ५ साठी)

दापोलीत सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा

पर्यटकांमध्ये नाराजी ; पंपांची संख्या कमी असल्याने गैरसोय

दाभोळ, ता. १६ः शहरालगत दापोली शहरातील दाभोळ मार्गावरील एक व खेर्डी येथील एक अशा दोन पंपावरच सीएनजी पुरवठा सुरू आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त व सीएनजीसाठी पंप कमी अशी परिस्थिती असल्याने वाहन चालकांना रांगा लावाव्या लागत आहे.
दापोली तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असेल्याने तेही सीएनजीवर चालणारी वाहने घेवून येत असल्याने या पंपावर सीएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. मुख्य कंपनीकडून या पंपांना सीएनजीचा पुरवठा कमी होत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. दापोलीला दिवसाला ५० हजार के.जी. सीएनजीची मागणी आहे. परंतु सीएनजीचाच साठा ३८ हजार के.जी. उपलब्ध आहे. त्यामुळे १२ हजार के.जी. सीएनजीची कमतरता आहे. दुपारनंतर सीएनजीची कमतरता जाणवत असल्याचे समोर येत आहे. तालुक्यात दररोज सीएनजीच्या तीन गाड्या येतात. सकाळी एक गाडी खेर्डी येथे तर दोन गाड्या जालगाव मार्गावरील पंपात येतात. यामुळे या गाड्या येईपर्यंत वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT