कोकण

दुचाकीस्वार महिलेची वृद्धाला धडक

CD

पान ३

दुचाकीस्वार महिलेची वृद्धाला धडक
रत्नागिरी ः शहराजवळील नाचणे-सुपलवाडी येथील रस्त्यावर दुचाकीवरुन जाणाऱ्या अज्ञात महिलेने पादचारी वृद्धाला धडक दिली. अज्ञात महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी नाचणे-सुपलवाडी रस्त्यावर बाईंग स्टॉप येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी वृद्ध शरद तुकाराम सावंत (वय ७५, रा. नाचणे शांतीनगर, रत्नागिरी) हे नाचणे-सुपलवाडी ते बाईंगस्टॉप असे चालत जात असताना संशयित महिला दुचाकी घेऊन जात असताना काजरघाटी दिशेकडून येणाऱ्या सफेद रंगाच्या दुचाकीवरील महिलेने सावंत यांना मागून धडक दिली व न थांबता ती निघून गेली. या अपघातात सावंत यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विषारी द्रव प्यायलेल्या विवाहितेचा मृत्यू
रत्नागिरी ः गुहागर तालुक्यातील पालशेत येथे बागकाम करणाऱ्या विवाहितेने विषारी द्रव प्यायले केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान मंगळवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. सुजाता सुधीर पवार (वय २७, रा. कोळकेवाडी-चिपळूण) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुजाता व तिचे पती सुधीर पवार गुहागर पालशेत येथे माधव सुर्वे यांच्या बागेत कामाला होते. सोमवारी सुजाता हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी द्रव प्यायले होते. तिला तातडीने कामथे येथील रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT