कोकण

आत्महत्येच्या प्रयत्नामुळे तरुणी सिव्हीलमध्ये

CD

.४९ (पान ३ साठी)


बीडमधील बालविवाहाचे बिंग फुटले

पोलिसांची तत्परता; पालकांवरही गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः बीड येथील एका अल्पवयीन मुलीशी लग्न करून तरुण रत्नागिरीत आला. पण त्या मुलीने झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
पोलिसांच्या चौकशीत ती मुलगी अल्पवयीन असल्याचे पुढे आल्याने बालविवाहाचे बिंग फुटले. याप्रकरणी बीड पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. दरम्यान पालकांविरोधात तसेच ''पोक्सो'' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अठरा वर्षे पूर्ण होऊन पाच दिवस झालेली विवाहित तरुणीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही बाब जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या मुलीची आणि तिच्या पतीची चौकशी केली. त्यावेळी तो तरुण २७ वर्षांचा आणि ती तरुणी पाच दिवसांपूर्वीच अठरा वर्ष पूर्ण झालेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ते दोघे नात्यातीलच असून त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे त्यांच्या नातेवाईकांनी काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचे बीड येथे लग्न लावून दिले होते. त्यानंतर नोकरीनिमित्त ते दोघे रत्नागिरीत आले होते. परंतु, या दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. दरम्यान, बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन लपवलेला गुन्हा अखेर यामुळे पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो बीड येथील पोलिस ठाण्यात वर्ग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT