कोकण

एमआयडीसीची पाईपलाईन फुटून झोपड्या जलमय

CD

५३ ( पान ३ साठी, महत्वाची)


-rat१४p३३.jpg -
OP२४M८३६९२
चिपळूण : फरशी तिठा येथे पाईपलाईन फुटून झोपडपट्टीत पाणी शिरल्याने असे नुकसान झाले.
---------------

एमआयडीसीची पाईपलाईन फुटली


पेढे फरशीतील घटना ; झोपड्या जलमय, टपऱ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः लोटे औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पेढे फरशी तिठा येथे फुटली. मुख्य रहदारीच्या रस्त्यावरच असलेली ही जलवाहिनी फुटल्याने एकच गोंधळ उडाला. पाण्याचे फवारे वीस ते पंचवीस फूट वर उडत होते. या पाण्याच्या दाबामुळे परिसरातील दुकाने आणि पान टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय परिसरातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
वाशिष्ठी नदीतील पाणी मोठ्या जलवाहिनीद्वारे लोटे एमआयडीसीला जलवाहिनीच्या माध्यमातून पुरवले जाते. वाशिष्ठी नदीतून जाणारी ही जलवाहिनी फरशी तिठा येथे मुख्य रस्त्यालगत जाते. गेले अनेक दिवस लोटे एमआयडीसीकडे जाणारी पाईपलाईन सातत्याने फुटत आहे. मध्यंतरी पेढे-परशुराम येथील पाईपलाईन फुटून अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. पाण्याचा फवारा उडून नुकसान देखील झाले होते. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पाईपलाईनला गळती लागून परिसरातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले आणि झोपडपट्टीधारकांचे मोठे नुकसान झाले. फरशी येथेच रस्त्याच्या कडेला काही टपरीधारक तसेच व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानांमध्येही पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे दुकानधारक प्रचंड संतापलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT