कोकण

पान एक-सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी

CD

सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी

सावट कायम ः आज यलो अलर्ट जारी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ ः विजांच्या गडगडाटासह सोमवारी (ता. १३) रात्री पावसाने वैभववाडी परिसराला झोडपून काढल्यानंतर आज जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या सरी झाल्या. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, हवामान विभागाने उद्या (ता. १५) यलो अलर्ट दिला आहे. या पूर्वमोसमी पावसामुळे पूर्वपट्टयातील आंबा, काजू पिकाचे नुकसान होणार आहे.
जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारपासून (ता. ११) पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी पावसाने बांद्यापासून वैभववाडीपर्यंत झोडपून काढले. रविवारी रात्रीदेखील बांदा आणि सावंतवाडी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. सोमवारी (ता. १३) दुपारी वैभववाडी तालुक्यात हलक्या सरी झाल्या. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली. रात्री अकराच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वैभववाडी तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. या परिसरात अर्धा तास पाऊस झाला. वाऱ्याचा वेगदेखील वाढला होता. सोमवारी (ता. १३) वैभववाडी, कणकवली, फोंडा परिसरातील पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या सरी झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अंतिम टप्प्यातील आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत.
................
चौकट
दोन दिवस पावसाचा अंदाज
जिल्ह्यात उद्या व गुरुवारी (ता. १६) हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस व प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT