कोकण

छत्रपती संभाजी महाराजांना बांदा नट वाचनालयात वंदन

CD

83674
बांदा ः नट वाचनालयात छत्रपती संभाजी महाराज जयंतीप्रसंगी उपस्थित मान्यवर.

छत्रपती संभाजी महाराजांना
बांदा नट वाचनालयात वंदन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः ‘‘छत्रपती संभाजी महाराज हे शूर योद्धा तर होतेच; मात्र ते उत्कृष्ट शासक व अभ्यासू होते. त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत स्वराज्याचा दहापटीने विस्तार केला. त्यांची स्वराज्यनिष्ठा, धर्मनिष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून त्यांच्या विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. भाटे बोलत होते. या वेळी नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, अंकुश माजगावकर, संचालक जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, भूषण सावंत, यश माधव, सीताकांत नाईक, स्वप्नीता सावंत, प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब, ओंकार धुरी, नैतिक मोरजकर, निशांत मोरजकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. राकेश केसरकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT