कोकण

आसोली नारायण विद्यामंदिरचा उद्यापासून शतक महोत्सव

CD

आसोली नारायण विद्यामंदिरचा
आजपासून शतकमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः आसोली (ता. वेंगुर्ले) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नंबर १ या शाळेचा शतकमहोत्सव १६ ते १८ मेपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शाळा शतकमहोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग आणि देणगीदार यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
यानिमित्त गुरुवारी (ता. १६) सकाळी ८ वाजता शोभायात्रा, सकाळी ९.३० वाजता शाळा प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन, पाककला दालनाचे उद्‍घाटन, दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व शतकमहोत्सवाचे उद्‍घाटन, शाळेच्या माजी शिक्षकांचा सत्कार व मान्यवरांची मनोगते होणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, निवृत्त बँक अधिकारी राजेश नाडकर्णी, आसोलीचे सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता राजेश नाडकर्णी यांचे गायन, ७ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व इतर कार्यक्रमांसह पारितोषिक वितरण समारंभ, मान्यवरांची मनोगते होणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शंकर कांबळी, मुंबईतील उद्योजक उदय आसोलकर, उद्योजक महादेव आंदुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, सचिन दळवी, विष्णुदास कुबल आणि माजी सभापती सुनील मोरजकर आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता महिला व माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘महापैठणीचा खेळ’ होणार आहे. निवेदन शुभम धुरी करणार आहेत. शनिवारी (ता. १८) सकाळी श्रींची महापूजा, ११ वाजता आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलावर्गाचे हळदी-कुंकू, ६ वाजता आसोली ग्रामस्थांची भजने व रात्री १० वाजा आसोली नारायणाश्रित नाट्यमंडळाचा ‘पांडगो इलो रे बा इलो’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT