कोकण

कोकण रेल्वेच्या जागा गाड्यांचे उन्हाळी वेळापत्रक विस्कळीत

CD

कोकण रेल्वेच्या जादा गाड्यांचे
उन्हाळी वेळापत्रक विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या जादा गाड्यांचे वेळापत्रक गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाले आहे. या मार्गावर सोडलेल्या जादा गाड्या तब्बल दहा ते पंधरा तास उशिराने धावत आहेत. आज एलटीटी ते मडगाव धावणारी जादा रेल्वेगाडी तब्बल १२ तास उशिराने धावत होती. याबाबत प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी हंगामासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेच्या जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. एप्रिलपासून या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र, या मार्गावरील जादा फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. एलटीटी ते मडगाव (गाडी क्र. ०१०१७) आठवड्यातून शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी एलटीटीहून सुटते. परतीसाठी ०१०१८ ही गाडी मडगाव येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावते. मात्र, यासाठी रेल्वेचा एकच रेक वापरण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून या गाडीचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. मुंबईकडे जात असताना मडगाव येथूनही गाडी तब्बल सहा ते सात तास उशिराने सोडली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यासह एलटीटी ते थिवी ही विशेष गाडी एलटीटी येथून शनिवार, सोमवार, बुधवारी धावते. परतीसाठी थिवी येथून ०११३० ही गाडी दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी धावते. याही गाडीचे वेळापत्रक सध्या विस्कळित झाले आहे. या दोन्ही गाड्यासाठी एकच रेक वापरला जात असल्याने या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT