कोकण

नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

CD

१३ (टूडे ३ साठी)

- rat१५p३.jpg-
P24M83801
संगमेश्वर ः तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची
नवी इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची नूतन इमारत पूर्ण होऊन पाच महिने झाले आहेत. तरीही अद्याप तिचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे या इमारतीमधून आरोग्यचे कामकाज सुरु करणे शक्य झालेले होत नाहीये.
येथील नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ती लवकरात लवकर ताब्यात द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. रायभोळे यांना पाच महिन्यांपूर्वी दिले आहेत. जुन्या इमारतीत अत्यल्प जागेत प्रशासकीय कारभार करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडत असून पावसाळ्यापूर्वी इमारतीचे उद्घाटन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विस्तीर्ण संगमेश्वर तालुक्यात १९६ गावे असून साखरपा, धामापूर, निवे, सायले, बुरंबी, कडवई, फुणगूस, कोंडउमरे, वांद्री, देवळे अशी ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तालुका आरोग्य कार्यालयातून केंद्रांचा प्रशासकीय कारभार चालविला जातो. गतवर्षीच्या पावसाळ्यात नूतन इमारतीच्या भिंतींना ओल आले होते. स्लॅबमधून पाण्याचा ओलावा येत होता. मुख्य दरवाजातून पावसाचे पाणी इमारतीत जात होते. इमारतीवरील टेरेसच्या पत्र्यातून पावसाचे पाणी जिन्यातून जमिनीवर साचत होते. या समस्या न सुटल्यास इमारतीमधील कागदपत्रे खराब होण्याची भीती व्यक्त व्यक्त केली जात आहे. नूतन इमारतीचे काम पूर्ण झाले असून साहित्य नेण्यास सुरूवात झाली आहे. इमारतीला वीज मीटर जोडणीचे काम अद्यापही अर्धवट राहिले आहे. सुमारे ७० लाख रुपयातून बांधलेल्या नूतन इमारतीतून पावसाळ्यापूर्वी प्रशासकीय कारभार सुरू होईल, असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. रायभोळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT