कोकण

क्राईम

CD

भरणेमध्ये आढळला मानवी सांगाडा

खेड ः शहराजवळील भरणे गवळवाडी जंगलमय भागातील पडक्या शेतघरामध्ये मानवीसदृश्य हाडे असलेला सांगाडा सापडला आहे. १३ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास हा सांगडा दिसला. पोलिसांनी बेवारस म्हणून हा सांगाडा दाखल केला आहे. हा सांगाडा नेमका कोणाचा याचा शोध खेड पोलिस घेत आहेत.
-------------
दुचाकीस्वार महिलेची वृद्धाला धडक

रत्नागिरी ः शहराजवळील नाचणे-सुपलवाडी येथील रस्त्यावर दुचाकीवरुन जाणाऱ्या अज्ञात महिलेने पादचारी वृद्धाला धडक दिली. अज्ञात महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी साडेदहाच्या सुमारास नाचणे-सुपलवाडी रस्त्यावर बाईंग स्टॉप येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी वृद्ध शरद तुकाराम सावंत (वय ७५, रा. नाचणे शांतीनगर, रत्नागिरी) हे नाचणे-सुपलवाडी ते बाईंगस्टॉप असे चालत जात असताना संशयित महिला दुचाकी घेऊन जात असताना काजरघाटी दिशेकडून येणाऱ्या सफेद रंगाच्या दुचाकीवरील महिलेने सावंत यांना मागून धडक दिली व न थांबता ती निघून गेली. या अपघातात सावंत यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT