कोकण

मिठबांव रामेश्‍वर हायस्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

CD

83775
मिठबाव ः येथील रामेश्वर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला.

मित्रमैत्रिणींच्या स्नेहमेळाव्याने रंगत

मिळबाव रामेश्‍वर हायस्कूलचे माजी विद्यार्थी


सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः मिठबाव (ता. देवगड) येथील रामेश्वर हायस्कूलच्या १९८० मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येथे उत्साहात झाला. येथील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी तत्कालीन शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला. सर्वांची आपापसांत माहिती घेण्यात आली.
समाजमाध्यमांच्या माध्यमातून मित्रमैत्रिणींनी एकत्र येण्याचे ठरविले. आनंद लोके, जयानंद फाटक, प्रमोद कांदळगावकर यांनी मित्रमैत्रिणींचा शोध घेतला. त्यानुसार सर्वांना एकत्रित करून स्नेहमेळावा घेण्यात आला. मित्रमैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणी जाग्या केल्या. तद्वतच शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देत असताना काही शिक्षक, मित्रमैत्रिणी हयात नसल्याचे कळताच त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना काहींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. या वेळी कोणी कोणत्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली, याचाही ऊहापोह करण्यात आला. या वेळी निर्मला खेडेकर, विजयालक्ष्मी डगरे, प्रदीप कोळंबकर, सूर्यकांत घाडी, लक्ष्मण खाडिलकर, दत्तात्रय टिकम, रवी लोके, विनोद पडवळ, मनोहर लोके, किशोर सरवणकर, शिवशंकर लोके, प्रवीण लाड, सुहास वळंजू, प्रेमानंद ढोके, प्रमोद ढोके आदी उपस्थित होते. प्रमोद कांदळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, पुन्हा भेटण्याचे ठरवून स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT