कोकण

सुर्वे, बीट अंमलदार देऊसकरांचा सन्मान

CD

१५ (टूडे ३ साठी)


- rat१५p४.jpg-
P24M83802
पावस ः उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार अवधूत सुर्वे व मिलिंद देऊस्कर यांचा सत्कार करताना अविनाश काळे व अविनाश दिवेकर सोबत इतर मान्यवर

अमंलदार सुर्वे, देऊसकरांचा सन्मान

पोलिस महासंचालक पदक ; ग्रामस्थांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा ः
पावस, ता. १६ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील जनसेवा सामाजिक मंडळातर्फे पूर्णगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अवधूत सुर्वे आणि बीट अंमलदार मिलिंद देऊसकर या दोघांना उत्तम सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र जाहीर झाले आहे. याबद्दल त्यांचा पूर्णगड पोलीस ठाण्यात शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि केशर आंबा कलम देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अविनाश काळे म्हणाले, पूर्णगड पोलीस ठाण्यातील पोलिसांचा उत्तम सेवेबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अवधूत सुर्वे आणि मिलिंद देऊसकर यांचे खूप अभिनंदन आहे. त्यांनी पूर्णगड पोलीस ठाण्याचा कारभार लोकाभिमुख करण्यावर भर दिला. या प्रसंगी प्रास्ताविकात पोलीस कर्मचारी प्रकाश झोरे यांनी सुर्वे आणि देऊसकर यांचा सन्मान ही खूप मोठी आणि उत्साह वाढवणारी गोष्ट असल्याचे सांगितले. तर पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी जनतेमधून नेहमी पोलिसांना नावे ठेवली जातात, मात्र गोळपच्या जनसेवा सामाजिक मंडळातर्फे झालेला सन्मान सुखावणारा आहे. या वेळी सत्काराला उत्तर देताना अवधूत सुर्वे यांनी हा सन्मान आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमावेळी जनसेवा मंडळाचे सचिव समित घुडे, सहसचिव प्रकाश संते, अविनाश दिवेकर, महेश पालकर, गोळपचे पोलीस पाटील निलेश भाटकर, धोपटवाडी पोलीस पाटील राजेंद्र उभारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मूरकर, पोलीस कर्मचारी निखिल साळवी, सोनाली शिंदे आणि अद्वैत काळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT