कोकण

किल्ले गगनगडावर उभारला हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ

CD

83789
गगनबावडा ः किल्ले गगनगड येथे शिवशौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, मुंबई परिवार या संस्थेने हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. (छायाचित्र ः एन. पावसकर)


किल्ले गगनगडावर उभारला
हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ ः शिवशौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, मुंबई परिवार व कोकण परिवार यांच्यातर्फे संयुक्तरीत्या गगनबावडा (जि. कोल्हापूर) येथील किल्ले गगनगड येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगड किल्ल्याचे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात आला.
या वेळी दुर्गसेवक, धारकरी बंधू, रणरागिणी, मावळे दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, गणेश माने, साई इंगळे, सुजित शेंगाळे, साक्षी इंगळे, अनामिका भगत, प्रवीण शेंगाळे, दशरथ इंगळे, देविदास शेंगाळे आदींसह वारकरी मंडळी व गडावरील सेवेकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर, गगनबावडा येथील श्री शेत्र गगनगिरी महाराज आश्रम व किल्ले गगनगड येथे प्रारंभी हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. त्याची विधिवत पूजा करून किल्ले गगनगड येथे कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकविण्यात आला. शिवशौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या मुंबई परिवार व कोकण परिवारातर्फे प्रतिवर्षी गड-किल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवून किल्ल्याची साफसफाई व स्वच्छता केली जाते. किल्ले गगनगड येथे या संस्थेतर्फे नुकत्याच उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारणीच्या कामाचे सर्वस्तरांतून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT