कोकण

नवोदय विद्यालयाचा दहावीचा निकाल जाहीर

CD

नवोदय विद्यालयाचा
दहावीचा निकाल जाहीर
सावंतवाडी ः केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सांगेलीच्या जवाहर नवोदय विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवत याहीवर्षी १०० टक्के निकाल लावला. विद्यालयातून एकूण ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ९० टक्केहून अधिक गुणांच्या ए- वन श्रेणीत ८ विद्यार्थी, ८० टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए टू श्रेणीत १२ विद्यार्थी, ७० टक्केहून अधिक गुणांच्या बी वन श्रेणीत २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी असे ः यशराज धुरी ९७ टक्के, श्रुती फपाळ ९५.८० टक्के, समृद्धी पाटील ९५.६० टक्के, अथर्व कपाडी ९२.८० टक्के, धनदा फाले ९२ टक्के, प्रतीक्षा पाटील ९१. ४० टक्के, तनया भोगले ९० टक्के, आर्या सातवसे ९० टक्के. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मुख्याध्यापक एन. के. जगदीश, उपप्राचार्य अशोक कांबळे, प्रसाद कनी, अशोक वने, एस. पी. हिरेमण आदींनी अभिनंदन केले.
--------------
धनुर्विद्या प्रशिक्षणला
जानवलीत प्रतिसाद
कणकवली ः बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, धनुर्विद्या संघटना, सिंधुदुर्ग व सिंधुरत्न स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिर जानवली येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात झाले. त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेऊन इंडियन धनुर्विद्या प्रकाराची माहिती घेत प्रत्यक्ष सरावही केला. शिबिर उद्‍घाटन व समारोपप्रसंगी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सचिव सुलेखा राणे, धनुर्विद्या संघटना उपाध्यक्ष व प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी, विनायक सापळे, संदीप सावंत, धनुर्विद्या संघटना सचिव अमित जोशी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी, आसावरी कुळकर्णी आदींची उपस्थिती होती. या शिबिराबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून असे उपक्रम अधूनमधून घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
------------------
‘कणकवली तायक्वांदो’चे
रत्नागिरीतील स्पर्धेत यश
कणकवली ः तायक्वांदो असोशिएन ऑफ महाराष्ट्र मान्यतेने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्य ओपन किरोगी व पूमसे निमंत्रित तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरी येथील रॉयल बॅक्यूट हॉल येथे झाली. यात कणकवली तालुका तायक्वांदो असोशिएनच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले. सबज्युनिअर गटात स्पृहा राणेने सुवर्ण पदक, सबज्युनिअर गटात शिरवलकरने कांस्य, ज्युनिअर गटात दुर्वा गावडे, ऋतुजा शिरवलकर यांनी कांस्य पदक पटकावले. आराध्या सबनीस, श्रुती गाडेकर, श्रीष्टी परीट, वेद खाडये, शिवांग पेडणेकर, प्रेसित कामत, ओमकार पाटील, लौकिक मुंडले, प्रणव कुडाळकर, अथर्व तेली यांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांना तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. तायक्वांदो असो. ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, अमित जोशी, विनायक सापळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
---------------
अक्षता कांबळींचा
वाघेरी येथे सत्कार
कणकवली ः कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेत्री अक्षता कांबळी यांना वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईतर्फे सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक राणे, खजिनदार सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, माजी सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे कांबळी यांना शाल. श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अशोक राणे, सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, अक्षता कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT