कोकण

नदीपात्रातील भरावामुळे घरांसह पुलाला धोका

CD

३ (टुडे पान १ साठी)


- rat१५p१६.JPG-
२४M८३८०९
लांजा ः आंजणारी येथील महामार्गालगत टाकलेला नदीतील धोकादायक भराव.
-----------

नदीपात्रातील भरावामुळे पुलाला धोका

स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष ; पावसाळ्यापूर्वी उपाय करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी (ता. लांजा) येथील काजळी नदीच्या किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात माती, दगडांचा भराव आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह विरुध्द बाजुच्या किना-याकडे वळलेला आहे. तेथील घरांना धोका निर्माण झाला होता. तसेच महामार्गावरील आंजणारी नदीवरील पुलाच्या खांबांनाही धोका पोचू शकतो. याबाबत स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली होती. याबाबत प्रशासनाने आदेश देऊनही पावसाळा तोंडावर आला तरी तेथे उपाययोजना केलेली नाही.
आंजणारी नदीत टाकण्यात आलेल्या माती, दगडांमुळे भविष्यातील संकंटाबाबत कुर्णे येथील ग्रामस्थ मनोहर कदम म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावर काम करणाऱ्यांनी माती, मोठे दगड, झाडांचे बुंधे यांचा भराव आंजणारी पुलाजवळील काजळी नदीच्या किनाऱ्यालगत निवसर रस्त्याच्या बाजूला टाकला. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अडथळा आला आहे. तो प्रवाह विरुद्ध बाजूला वळला आहे. कुर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाच घरांना पुराचा वारंवार धोका होत आहे. तसेच नदी किनाऱ्याजवळच्या पुनसकोंड-कुर्णे या दोन गावाच्या रस्त्याच्या खालील भरावाचा भागही धुपून गेला होता. तेथील ग्रामस्थ, विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. तसेच याचठिकाणी काजळी नदीवरील आंजणारी येथील महामार्गावरील मुख्य पुलाच्या खांबांनाही धोका निर्माण होऊ शकतो. या भरावामुळे पात्र बदलून पाण्याचा वेग व वाढलेली पाण्याची पातळी यांचा फटका बसून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुढील कार्यवाही करा असे आदेशही दिले होते. त्यानुसार भराव काढण्याबाबत ठेकेदाराला सूचना केलेल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पुढील पावसाळा तोंडावर आला तरी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून उपाययोजना झालेल्या नाहीत.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT