कोकण

खेड-खेडमधील ३५ वाड्यांमधील ग्रामस्थांची वणवण

CD

खेडच्या ३५ वाड्यांमधील ग्रामस्थांची वणवण

भीषण टंचाईने हैराण; ३ हजार ९२० ग्रामस्थांना फटका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ ः तालुक्यात पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केल्याने आतापासूनच ग्रामस्थांसह प्रशासन रडकुंडीस आले आहे. तालुक्यात ३२ गावे ३५ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहचत असून, तब्बल ३९२० ग्रामस्थ तहानलेले आहेत. सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके फुरूस- गावठण वाडीतील ग्रामस्थांना बसत आहे, तर सर्वाधिक कमी पाणीटंचाईची झळ तळे-धनगरवाडी व घेरासाळगडातील ओझरवाडी येथील ग्रामस्थांना बसत आहे. या दोन्ही वाड्यांतील अवघ्या १० ग्रामस्थ तहानलेले आहेत.
तालुक्यात ८ एप्रिलपासून पाण्याचा पहिला टँकर धावू लागला आहे. सुसेरी-देवसडे येथील ६ वाड्यांमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागल्यानंतर एकामागोमाग एक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल हाऊ लागले. रणरणत्या उन्हामुळे पाण्याचे उपलब्ध जलस्रोत आटत आटत असल्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तहानलेल्या गाव-वाड्यांचे अर्ज प्राप्त होताच प्रशासनाकडून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही केली जात असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे.
तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ फुरूस येथील १२ वाड्यांना सर्वाधिक पाणीटंचाईची झळ बसत असून तब्बल २३१९ ग्रामस्थ तहानलेले आहेत. याच गावातील गावठण वाडीला सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके बसत असून ५०४ ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत. या खालोखाल सुसेरी-देवसडे येथील ६ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत असून ४१३ ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत.
घेरारसाळगडातील ५ वाड्यांत टंचाई आहे. या खालोखाल कशेडी येथील ३ वाड्यांतील २६५ ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. कुळवंडी-शिंदेवाडी येथील ३०० ग्रामस्थांनाही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. सवणस येथील दोन वाड्यांना अजूनही टँकरची प्रतीक्षाच आहे.
--------
चौकट
दोन टॅंकरमुळे प्रशासनाची दमछाक
रखरखत्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत तळ गाठत असल्याने टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरीदेखील प्रशासनाकडे अवघे दोनच टँकर उपलब्ध असून दिवसाला टँकरच्या ८० फेऱ्या धावत आहेत. अपुऱ्या टँकरमुळे तहानलेल्या गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाकच होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT