Koyna Dam Electricity esakal
कोकण

Koyna Dam : कोयना प्रकल्पातून विक्रमी वीज निर्मिती; पाण्याचे व्यवस्थापन ठरले उत्पादनाचे फलित

कोयना जलविद्युत प्रकल्प (Koyna Hydroelectric Project) महाराष्ट्राचे शक्तिपीठ आहे.

सकाळ डिजिटल टीम

१९६२ पासून कोयना प्रकल्पातून कोट्यवधी युनिट्स विजेची निर्मिती झाली आहे. या प्रकल्पाला ६१ वर्षे पूर्ण झाली.

चिपळूण : कोयना धरणातील (Koyna Dam) वीज निर्मितीसाठी (Power Generation) राखीव असलेल्या पाण्यापैकी आठ टीएमसी पाणीसाठा कपात करण्यात आला. तरीही उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करून यावर्षी विक्रमी वीज निर्मिती करण्यात आली. महानिर्मितीचे सुयोग्य व्यवस्थापन हेच विक्रमी उत्पादनाचे फलित ठरले. ६२ वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या कोयना प्रकल्पाने मागणीच्या काळात नेहमीच अतिरिक्त वीज उपलब्ध करून दिली आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प (Koyna Hydroelectric Project) महाराष्ट्राचे शक्तिपीठ आहे. १६ मे १९६२ ला कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती झाली. १९६२ पासून कोयना प्रकल्पातून कोट्यवधी युनिट्स विजेची निर्मिती झाली आहे. या प्रकल्पाला ६१ वर्षे पूर्ण झाली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ७० मेगावॉट क्षमतेचे चार युनिट आहेत. त्यातून २८० मेगावॉट वीज निर्मिती होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ८० मेगावॉट क्षमतेचे चार युनिट आहेत. त्यातून ३२० मेगावॉट वीज निर्मिती होते.

प्रकल्पाची एकूण निर्मितीची क्षमता १९६० मेगावॉट आहे. टप्पा एक आणि दोन ते नुकतेच आधुनिकीकरण करण्यात आले. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी कमी पाऊस झाला. १०५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या कोयना धरणात यावर्षी केवळ ९१ टीएमसी पाणीसाठा होता. सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढल्यानंतर धरणातील राखीव आठ टीएमसी पाणी साठा सिंचन आणि पिण्यासाठी देण्यात आला. त्यामुळे वीज निर्मितीच्या पाणीसाठ्यात कपात झाली. जानेवारी ते मार्च पर्यंत केवळ साडेतीनशे ते चारशे मेगावॉट वीज निर्मिती केली जात होती. मार्चनंतर विजेची मागणी वाढली. त्यावेळी प्रकल्पातून समाधानकारक वीजनिर्मिती सुरू झाली आहे.

‘महानिर्मिती’ कंपनीने मागील महिन्यात कमाल १० हजार ५७६ मेगावॉट वीज उत्पादन केली. त्यात कोयना जलविद्युत केंद्राचा वाटा एक हजार ८३५ मेगावॉट होता. कमी पाणी साठा असताना पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे अतिरिक्त आणि समाधानकारक वीज निर्मिती करता आली. यामध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले.

- संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी

मुख्य अभियंता चोपडेंचा सत्कार

वीज निर्मितीसाठी कमी पाणीसाठा मिळाल्यानंतरही उपलब्ध पाण्यात समाधानकारक वीज निर्मिती झाली. गरजेच्या वेळी कोयनेतून चांगली वीज निर्मिती झाल्यामुळे संभाव्य भारनियमन टाळता आले. त्यामुळे महानिर्मिती कंपनीचे महाव्यवस्थापक बी. अनबलगन यांच्या हस्ते मुख्य अभियंता संजय चोपडे यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

Weight Gain Foods: तुमचं वजन वाढवायचंय का? मग आहारात 'या' पदार्थांचा नक्की समावेश करा!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

SCROLL FOR NEXT