कोकण

रामराजे स्कूलचा निकाल १०० टक्के

CD

पान ५
रामराजे स्कूलचा निकाल १०० टक्के
दाभोळ ः सीबीएसई बोर्डअंतर्गत दहावीच्या परीक्षेचा ब्रिलियंट करिअर अॅकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. शाळेतील ओवेस नागोठणे याने ९२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच स्वराज मुरुडकरने ९० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. शिस्तबद्ध अभ्यासाचे नियोजन, प्रचंड मेहनत आणि ध्येयदृष्टीने केलेला अभ्यास यामुळेच हे यश मिळाले, असे मत ओवेस नागोठणे यांनी केले आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेगळे पॅटर्न शाळेने तयार केले असून, त्याचीच प्रचिती ही निकालामध्ये प्राप्त झाली आहे. संस्थेचे संचालक संदीप राजपुरे, सनदी लेखापाल संदीप खोचरे, संदीप सावंत आणि डॉ. उमेश वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

क्रिकेट स्पर्धेत के. के. डब्ल्यू संघ विजेता
दाभोळ ः दापोली तालुक्यातील कोंढे येथे आयोजित कोंढे प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत के. के. डब्ल्यू ११ संघ विजेता संघ ठरला. शिवशक्ती वॉरियर्स संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत ७० हून अधिक खेळाडूंचा सहभाग होता. हे सामने कोंढे गावात खेळविण्यात आले. या स्पर्धेत चार संघ खेळले. शंकर पाटील, संतोष पाटील, गाव पुजारी काशिनाथ कदम यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. विजेत्या संघाला ट्रॉफी, पारितोषिक देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

SCROLL FOR NEXT