कोकण

-नेपाळ्यांची नोंद न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू

CD

४० (पान ५ साठी)

रखवालदारांची नोंद न करणाऱ्यांवर कारवाई

धनंजय कुलकर्णी ः बागायतदार, नौका मालकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : तालुक्यातील पावस नजीकच्या गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलिसांनी नेपाळ्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वीस वर्षात गुरखा (नेपाळी) व्यक्तींकडून गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यात आंबा, मासेमारीसाठी येणाऱ्या व्यक्तींची संबंधित पोलिस ठाण्यात नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. अन्यथा नोंदणी न करणाऱ्या आंबाबाग मालक, नौका मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला.
पावसजवळच्या गोळप मुस्लिम मोहल्ला येथील मुदस्सर मुकादम यांच्या बागेत रखवालदार असलेल्या भक्त थापा, ललन थापा या दोन भावांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्यासोबत असलेल्या नेपाळी सहकार्याने त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. आता जिल्हा पोलिसांनी नेपाळी रखवालदार व खलाशी यांच्याबाबत कठोर पावले उचलली आहेत.
बागायतदार किंवा नौका मालकांकडे असलेल्या रखवालदारांची माहिती उपलब्ध नसल्याचे पुढे आले आहे. रखवालदार व्यक्तीने गुन्हा केल्यानंतर तो थेट नेपाळला पळून जातो किंवा देशात गायब होते. त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती नसल्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना अवघड होते. त्यामुळे ज्यांच्याकडे नेपाळी व्यक्ती काम करणार आहे. त्यांनी नेपाळी व्यक्तीची परिपूर्ण माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT