कोकण

रत्नागिरी-क्राईम

CD

डंपर चालकावर
अपघातप्रकरणी गुन्हा
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा दर्ग्याच्या पुढे गुरववाडी रस्त्यावर डंपर टेम्पोवर पडला. या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हातखंबा दर्गा येथील रस्त्यावर घडली. फिर्यादी यांच्या मालकीचा टेम्पो घेऊन चालक नीलेश प्रकाश साळुंखे (रा. नांदरे, मिरज, सांगली) हे रत्नागिरी ते सांगली-मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पाली दिशेकडून येणारा डंपर मातीच्या ढिगाऱ्यावरून टेम्पोवर उलटला. या अपघातात फिर्यादी गणेश चंद्रकांत कोळी हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच डंपर चालकाने पलायन केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोळी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------------

गुरख्‍याच्या खुनप्रकरणी
संशयिताला कोठडी
पावस : तालुक्यातील गोळप मुस्लिमवाडी येथील एका बागेमध्ये गुरख्‍याने सख्‍ख्या भावाचा दारूच्या नशेमध्ये खून केला. याप्रकरणी संशयिताची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ही घटना २९ एप्रिलला घडली होती. भक्त थापा क्षेत्री व खडकबहादूर थापा क्षेत्री हे दोघे सख्खे भाऊ आणि संशयित सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षती राम विश्वकर्मा हे तिघेजण बाहेर दारू पिऊन मुराद मुकादम यांच्या बागेमध्ये आल्यानंतर पुन्हा तिघे मिळून दारू प्याले. दारूच्या नशेमध्ये वाद झाल्यानंतर संशयित गोपाळ विश्वकर्मा याने या दोघांना दगडधोंड्याने व हत्याराने मारहाण केली व फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्‍या माध्यमातून संशयिताचा शोध लावला आणि त्याला अटक केली. संशयित गोपाळ विश्वकर्मा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आरोपीला घेऊन घटनेची माहिती घेतली. पाच दिवसांनंतर पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला जामीन मंजूर न झाल्याने त्याची जेलमध्ये रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT