कोकण

मारहाण, धमकीप्रकरणी तारकर्लीत दहाजणांवर गुन्हा

CD

मारहाण, धमकीप्रकरणी
तारकर्लीत दहाजणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : तारकर्ली येथील दहा जणांच्या जमावाने एकत्र येऊन मारहाण, शिवीगाळ तसेच धमकी दिल्याप्रकरणी तारकर्ली येथील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद देवबाग राउळवाडी येथील मच्छिमार तसेच पर्यटन मार्केटींग व्यावसायिक पंकज रविंद्र केळुसकर (वय २२) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली.
कांचन केरकर, जितेश केरकर, समीर गोवेकर, नितीन तोडणकर, नितेश तोडणकर, हेमराज सावजी, सुनिल मोंडकर, प्रशांत केळुसकर, महेश खराडे, रोहन मयेकर अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काल (ता.१४) दुपारी तारकर्ली येथे घडला. केळूसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपल्या ताब्यातील दुचाकी व कांचन केरकर यांच्या दुचाकीच्या वादाच्या कारणावरुन १० जण एकत्रीत आले. कांचन केरकर याच्याशी केलेल्या हुज्जतीबाबत माफी माग, असे सांगत त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच मालवण परिसरात तुला फिरू देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.
---------------
महिलेस धक्काबुक्कीप्रकरणी
तारकर्लीत २५ जणांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : नवरा व दिरास लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असताना त्यांना सोडविण्यास गेलेल्या महिलेला धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी दुपारी तारकर्ली येथे घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, तिचे दिर यांच्यासमोर पंकज केळुसकर हा त्याच्या दुचाकीने आला. त्यास काय करतोस, असे विचारले असता त्याचा राग धरुन त्याने पती व दिर यांना मारण्यासाठी जमाव केला. काहींनी पती व दीर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या अंगावरील कपडे फाडुन त्यांना दुखापत केली. यावेळी सोडविण्यास गेले असता जमावाने धक्काबुक्की करून शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानुसार संशयित कुंदन भाबल, सतिश निवतकर, हेमंत राऊळ, गौतम खोबरेकर, विकास ताम्हणकर, समीर कांदळगावकर, मनोज चोपडेकर, समीर सारंग, पंकज केळुसकर, जयेश ढोलये, जितेंद्र चोपडेकर वैगरे २५ ते ३० जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.
---------------
सांगेली-सावरवाड येथे
बागेला भीषण आग
सावंतवाडी, ता. १५ ः सांगेली-सावरवाड येथील सदानंद रावजी म्हाडगूत यांच्या १५ एकरमधील काजू, नारळ, सुपारी बागेला आग लागून पाईप लाईनसह तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी घडली. याबाबत श्री. म्हाडगूत यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. श्री. म्हाडगूत यांची १५ एकरमध्ये बाग असून अचानक या बागेला आग लागली. त्यांनी आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. यात बागेतील काजू, बांबू, सुपारी, नारळ व पाईपलाईन जळून मोठे नुकसान झाले. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT