कोकण

रत्नागिरी ःभाट्ये दर्गास्टॉप येथे मोटारीची दुचाकीला धडक

CD

-rat15p25.jpg
83872
रत्नागिरी ः शहराजवळील भाट्ये दर्गास्टॉप येथील अपघातग्रस्त दुचाकी व मोटार.

मोटारीची दुचाकीला धडक

भाट्ये दर्गास्टॉप येथील घटना; स्वार गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः शहरानजीकच्या भाट्ये दर्गा स्टॉप येथे मोटार आणि दुचाकीत अपघात झाला. मोटारीने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
केतन शशिकांत साळवी (वय ३६, रा. फणसोप टाकळेवाडी, रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या स्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता १५) दुपारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी केतन दुचाकी घेऊन रत्नागिरीहून फणसोपला आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास राहुल अण्णासाहेब पतनकुट्टे (वय २५, रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) हा मोटार घेऊन पावस ते रत्नागिरी असा येत होता. ही दोन्ही वाहने भाट्ये दर्गा स्टॉप येथे आली असता राहुलचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्‍या केतन साळवीच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, त्यात दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला व मोटार रस्त्याच्या २५ ते ३० फूट खाली जाऊन झाडीत अडकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT