कोकण

संगीत अमृतवेल नाटकाचा रविवारी सावरकर नाट्यगृहात प्रयोग

CD

२२ (टुडे ३ साठी)


-rat१६p१०.jpg-
२४M८३९८२
रत्नागिरी : खल्वायनच्या संगीत अमृतवेल नाट्य प्रयोगातील एक क्षण.
----------

‘संगीत अमृतवेल’ नाटकाचा रविवारी प्रयोग

स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजन; मनोहर जोशी दिग्दर्शित

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : कोल्हापूरला झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांकप्राप्त खल्वायन संस्थेचे संगीत अमृतवेल हे नवेकोरे नाटक रत्नागिरीकर रसिकांना पाहता येणार आहे. येत्या रविवारी (ता. १९) सायंकाळी ५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रयोग होणार आहे.
संगीत अमृतवेल हे खल्वायन संस्थेचे आठवे नवे कोरे संगीत नाटक आहे. प्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले आहे. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाने ८ वैयक्तिक पारितोषिकांसहित तृतीय क्रमांक प्राप्त केला. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून सामाजिक विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी ज्या ज्या संतांनी आपले आयुष्य वेचले, त्यासाठी अनंत यातना भोगल्या, त्या महान विभूतींमध्ये संत चोखामेळा यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. या संत चोखामेळा यांच्या जीवन चरित्रावरील हे नवीन संगीत नाटक आहे.
या नाटकात सावनी शेवडे, अनामय बापट हे युवा कलाकार, ज्येष्ठ कलाकार राम तांबे, चेतन जोशी, प्रदीप तेंडुलकर, मनोहर जोशी, विजय जोशी आणि अनिकेत आपटे, निता जोशी, कौस्तुभ सरपोतदार, बालकलाकार राजस सिनकर, निखिल जोशी, मंजिरी जोशी, ओंकार जोशी, काव्या जोशी, मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे आदी कलाकार आहेत. साथसंगत हेरंब जोगळेकर, स्वानंद नेने, देवाशिष बापट, प्रथमेश फाटक करणार आहेत. रंगभूषा रामदास मोरे, संगीत दिग्दर्शन राम तांबे, प्रकाशयोजना मंगेश लाकडे, पार्श्वसंगीत प्राजक्ता जोशी, वेशभूषा श्रीनिवास जोशी यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT