कोकण

''रत्नागिरी-८'' भात बियाण्याची ३० टन विक्री

CD

२ (टूडे पान १ साठी, फ्लायर)


-rat१६p५.jpg-
२४M८३९४३
रत्नागिरी ः कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेली रत्नागिरी-८ ही भात बियाण्याची जात.
-----------

शिरगाव केंद्रातून ''रत्नागिरी-८'' भात बियाण्याची ३० टन विक्री

डॉ. विजय दळवी ; पालघर, ठाणे, रायगडसह कोल्हापूरमधूनही मागणी

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः येथील शिरगाव भात संशोधन केंद्रातून तयार झालेल्या बारीक दाण्याच्या भातजातींच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. यंदा कोकण कृषी विद्यापीठाने २०० टन भात बियाण्याची विक्री केली. शिरगाव कृषी संशोधन केंद्रातून रत्नागिरी ८ या बियाण्याची ३० टन विक्रमी विक्री झाली, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी विजय दळवी यांनी दिली.
मे महिन्यात कोकणातील शेतकरी भातशेतीच्या तयारीला लागतो. प्रारंभी लागवडीसाठी आवश्यक भात बियाणे शोधले जाते. कोकणातील वातावरणाचा अंदाज घेऊन भातपिकाची तयारी केली जाते. भात खाचराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हळव्या, निमगरव्या व गरव्या जातीची मागणी शेतकरी करतो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन यंदा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने ५५ टन विविध भात बियाण्यांचे उत्पादन केले आहे. या बियाण्यामध्ये रत्नागिरी-१ चे ६ टन, रत्नागिरी-६ चे नऊ टन, रत्नागिरी-७ (लाल तांदूळ) चे २.५ टन, रत्नागिरी-८ चे २५ टन, रत्नागिरी-२४ चे एक टन असे सुमारे ४३.५ टन भात बियाणे विक्रीसाठी ठेवले होते. उपलब्ध बियाण्यांमध्ये रत्नागिरी-८ या बियाण्याची २५ टनाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापुरातील शेतकऱ्यांना सर्वाधिक २० टन बियाणे दिले. त्यामध्ये रत्नागिरी-१ पाच टनाचा समावेश आहे तसेच एका खासगी कंपनीच्या माध्यामातून रत्नागिरी-८ भात बियाणे विदर्भापर्यंत पोचले.
मे महिन्यापासून शिरगाव येथील भात संशोधन केंद्राकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली होती. त्यानुसार पालघर-ठाणे येथे रत्नागिरी- ६चे आठ टन, रत्नागिरी-८चे तीन टन, रत्नागिरी-६चे दोन टन बियाणे देण्यात आले. काही बियाणी ही दापोली व फोंडाघाट येथून वितरित केली गेली. रत्नागिरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांना ३२ टन बियाणे देण्यात आले तसेच रत्नागिरी-८ या भात बियाण्यासाठी कोतवडे, गणेशगुळे, काळबादेवी येथे लागवडीला प्रोत्साहन दिले गेले.
------
कोट
कोकणातील भौगोलिक परिस्थिती येथील हवामानाचा विचार करून शेतकरी हळव्या जातीचे बियाणे म्हणजेच १२० दिवसात होणारे तसेच निमगरव्या जात १२० ते १३५ दिवसात होणाऱ्या भातजाती तसेच गरव्या म्हणजेच १३५ दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणाऱ्या भात बियाण्यांचा वापर करत आहेत.
- डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, शिरगाव भात संशोधन केंद्र
------
चौकट
केंद्राकडे १२ भातजाती उपलब्ध
शिरगाव संशोधन केंद्राच्या शंभर वर्षाच्या कार्यकाळात केंद्राने निर्माण केलेल्या भात, भूईमुग पिकाच्या विविध जाती शेतकऱ्यासाठी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनही करत आहेत. सद्यःस्थितीत केंद्राकडे १२ भातजाती उपलब्ध आहेत; मात्र अलीकडे कृषी संशोधन केंद्रातून लोकप्रिय शेतकऱ्यांच्या आवडीच्या रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४, रत्नागिरी ६ (लाल दाणे), रत्नागिरी-७, रत्नागिरी-८ (सुवर्णा) आदी जातींचा समावेश आहे. विद्यापिठाने विकसित केलेल्या भात बियाण्याची मागणी वाढत असल्याचे डॉ. दळवी यांनी सांगितले.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT