कोकण

-हिंदू धर्मात स्त्रियांना मानाचे स्थान

CD

२७ (टुडे २ साठी)


-rat१६p१९.jpg-
२४M८४००६
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीच्या सक्षमीकरण प्रशिक्षण वर्गामध्ये बोलताना अॅड. प्रिया लोवलेकर.
------------

हिंदू धर्मात स्त्रियांना मानाचे स्थान

अॅड. प्रिया लोवलेकर ः सक्षमीकरण प्रशिक्षण वर्गाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा तिने जे पाच प्रश्न विचारले त्याच पाच प्रश्नांना भारतीय संविधानात महत्व आहे. आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना मानाचे स्थान दिले आहे. पैसा, बुद्धी आणि शक्ती यांच्या देवता स्त्रिया आहेत म्हणजेच आपल्या धर्मात स्त्रीचा आदर केला जातो हेच आपली संस्कृती शिकवते, असे प्रतिपादन कायदेविषयक सल्लागार, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रिया लोवलेकर यांनी केले.
राष्ट्रसेविका समितीच्या सक्षमीकरण प्रशिक्षण वर्गाच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी दक्षिण रत्नागिरी बौद्धिक प्रमुख स्मिता अभ्यंकर प्रमुख वक्त्या होत्या. सुरवातीला ध्वजवंदन, प्रार्थना झाली. पाच दिवसाच्या वर्गामध्ये शिबिरार्थी मुलींना खूप शिकायला मिळाले. कार्यशाळेमुळे पत्रावळी बनवणे, आंब्याच्या कोयीपासून रोपे तयार करणे, ओरिगामी आदी विषयांचे प्रशिक्षण मिळाले. रोज वेगवेगळ्या चर्चासत्रातून आणि बौद्धिकातून नवीन आणि विविध विषयांचे ज्ञान मिळाले. त्या शिवाय सक्षमीकरण या विषयांतर्गत योग, व्यायाम, स्वसंरक्षणार्थ नियुद्ध याचे महत्व सांगून त्याचे वर्गात प्रशिक्षण दिले. सेविकांच्या शारीरिक व मानसिक बौद्धिक सक्षमीकरणाद्वारे समाजाचे सक्षमीकरण हा मुख्य उद्देश आहे. स्मिता अभ्यंकर यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम यावर बौद्धिक सादर केले. श्रीराम कथा सहजसोप्या भाषेत सांगितली. मर्यादा पुरुषोत्तम राम का म्हणतात ते मुलींना समजावून सांगितले. रामासारखा संयम ठेवणे आपल्याला जमणे महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT