कोकण

काँग्रेसची बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक

CD

९ (टुडे पान १ साठी)


-rat१६p१७.jpg -
२४M८४००२
चिपळूण ः कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करताना काँग्रेसचे पदाधिकारी.
--------------

काँग्रेसची बांधकाम विभाग कार्यालयावर धडक

प्रलंबित विकासकामे ; अभियंत्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी व प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता अमर रामसे यांच्याशी चर्चा केली.
चिपळूणमधील एन्रॉन पुलाच्या कामाची प्रगती, पाण्याचा निचरा व्हावा याकरिता मोऱ्या सफाई करणे, चालकांच्या माहितीसाठी फलक लावणे, कुंभार्ली घाटातील रस्त्याची तसेच इतर सुरक्षेच्यादृष्टीने असणारी कामे, शिरगाव-कुंभार्ली पुलाच्या कामाची प्रगती, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे होणारे अपघात, पिंपळी ते घाटमाथा रस्ता रूंदीकरण, ठेकेदारांकडून करण्यात येणारी निकृष्ट दर्जाची कामे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यकारी अभियंता अमर रामसे यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या अभियंत्यांना अपूर्ण कामाच्या पूर्ततेसाठी सूचना केल्या. या वेळी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, सेवादलाचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष केशव लांबे, बाबा चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, माजी नगरसेविका सफा गोठे, वीणा जावकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते उपस्थित होते.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT