कोकण

हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा फटका

CD

kan163.jpg
84037
हरकुळ बुद्रुकः येथील ल. गो. सामंत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक टप्प झाली होती.

kan164.jpg
84038
हरकुळ बुद्रुक ः कणकवली शहरापासून जवळच असलेल्या मुडेश्वर मैदानालगत नरडवे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
-----------------

हरकुळ बुद्रुकला वादळी पावसाचा फटका
झाडांच्या पडझडीने वाहतुक ठप्प; कनकनगर, शिवशक्तीनगरमध्ये वीज पुरवठा खंडीत
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ः मान्सूपुर्व पावसाने आज दुपारी दीडच्या सुमारास तालुक्यातील बहुतांशी गावांना झोडपून काढले. तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नागवे, करंजे, कळसुली, हळवल परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे काही गावातील वीजतारा तुटल्याने वीजप्रवाह खंडीत झाला होता. कणकवली शहरातील शिवशक्तीनगर, कनकनगर परिसरात झाडांच्या फाद्या तुटल्याने सायकांळी उशीरापर्यत वीजपुरवठा बंद होता. कणकवली ते कनेडी मार्गावर जागोजागी झाडे कोसळल्याने वाहतुक दोनतास ठप्प होती.
गेल्या काही दिवसापासुन उन्हाचा पारा वाढला होता. हवामान विभागाने मान्सूपुर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. दुपारी एकवाजल्या पासून ढगाचा गडगडाटासह वीजा जमकत होत्या. कनेडी पंचक्रोशी, फोंडाघाट परिसर, कळसुली परिसर आणि कणकवली शहरात या वादळीवाऱ्याचा परिणाम दिसून आला. कणकवली शहरातील काही भागात झाडांच्या फाद्या तुटून पडल्याने अनेक ठिकांणी वीजप्रवाह बंद झाला होता. हळवल, कळसुली परिसरात वीजखांब कोसळल्याने नुकसान झाले.
कणकवली ते कनेडी या मार्गावरील मुडेश्वर मैदानालगत रस्त्यावर झाड पडल्याने एकतास वाहतुक ठप्प होती. तर हरकुळ बुद्रुक ल. गो. सामंत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुक बंद झाली होती. हरकुळ बुद्रुक काळीतर ते मुडेश्वर मैदानापर्यत अनेक ठिकाणी झाडे कोसळली. कणकवली शहरातील शिवशक्तीनगर येथील रस्त्यावर झाडाच्या फाद्या पडल्याने वाहतुक बंद झाली होती. या परिसरातील काही घरांच्या छपरावरील लोंखडी पतरेही उडाले होते. तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दोन दिवसापुर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेवून दक्ष राहण्याच्या सुचना केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT