कोकण

३५ वर्षानी एकवटले माजगाव विद्यालयाचे विद्यार्थी

CD

swt169.jpg
84046
माजगावः येथे एकत्र आलेले शाळेचे माजी विद्यार्थी.

३५ वर्षानी एकवटले माजगाव विद्यालयाचे विद्यार्थी
१९८७-८८ बॅच ः शाळेसाठी आर्थिक मदतही सूपूर्त
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ः श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७-८८ मध्ये दहावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. यावेळी शाळेच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजार ५५५ रुपयांची देणगी तसेच स्मरणिकेसाठी २० हजार रुपयांची देणगी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
विद्यालयात १९८८ शालान्त परीक्षेतील माजी विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पराडकर, शाळेचे मुख्याध्यापक चवरे, निवृत्त शिपाई प्रभाकर कानसे, माजी विद्यार्थी गुरुनाथ धुरी, ॲड. सुजाता नाईक, तुकाराम भोगण आदी उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगत शिक्षक अविनाश शिरोडकर, श्रीमती भाट, श्री. दळवी, श्री. कानसे, श्री. दाभोलकर व माजी दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या त्याच्या कार्यकतृत्वांची ओळख करून दिली. धोंडीराज कशाळीकर, ॲड. सुजाता नाईक, वर्षा हजारे, संगीता सावंत, सुवर्णा धुरी, मिलिंद सावंत, सुशील सावळ, जोस्त्ना कासार, श्याम बोंद्रे, शैलेश कोरगावकर, सुशील देसाई, विद्या माधव, लक्ष्मण वर्णेकर, भास्कर माजगावकर, मंदा पिकुळकर, छाया सावंत, गुरुनाथ धुरी यानी मनोगत व्यक्त केले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी मिलिंद सावंत सुशील सावंत व गुरुनाथ धुरी यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन करून भास्कर माजगावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT