कोकण

बिबवणेत सोमवारी ''स्वरसंध्या'' कार्यक्रम

CD

बिबवणेत सोमवारी
‘स्वरसंध्या’ कार्यक्रम
कुडाळः बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मीनारायण विद्यालयातर्फे आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतकांच्या मेळाव्याच्या निमित्ताने सोमवारी (ता. २०) सायंकाळी ६.३० वाजता ''स्वरसंध्या'' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बिबवणे येथे लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिध्द गायिका नेहा करमरकर-कुलकर्णी व गायक गणेश मेस्त्री गायन करणार आहेत.
............
उभादांडा येथे
संस्कार शिबिर
वेंगुर्लेः बॅ. नाथ पै सेवांगण मालवण व ‘माझा वेंगुर्ला’ यांच्यावतीने २२ ते २६ मेपर्यंत आरोग्यधाम उभादांडा येथे सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत फक्त १० ते १८ वयोगटासाठी सानेगुरुजी संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात एरोबिक्स, योगा, कॅलेस्थिनिक्स, नृत्य, गाणी, गोष्टी, गटचर्चा, खेळ, पथनाट्य, लेझिम, झांज, दांडिया आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. उपस्थितांना साथी बाबासाहेब नदाफ व सहकारी (शिरोळ) हे मार्गदर्शन करणार आहेत. या संस्कार शिबिरात प्रथम येणाऱ्या ४० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी मंगल परुळेकर किंवा राजन गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर आणि ‘माझा वेंगुर्ला’चे अध्यक्ष शेटये यांनी केले आहे.
...............
रस्त्यावर झाड पडल्याने
आयनोडेत एकेरी वाहतूक
दोडामार्गः दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील आयनोडे पुनवर्सन भूतनाथ मंदिरजवळ रस्त्यालगतचे झाड बुधवारी सकाळी उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने बराच वेळ एकेरी वाहतूक सुरू होती. स्थानिकांनी सदर झाड हटवून रस्ता खुला केला. दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी धोकादायक झाडे असून या झाडांमुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT