कोकण

पालशेतमधील विवाहितेची आत्महत्या

CD

पान ३

पालशेतमधील विवाहितेची आत्महत्या
गुहागर, ता. १६ ः तालुक्यातील पालशेत आंबाबागेत काम करणाऱ्या विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. सुजाता सुधीर पवार (वय २७, अलोरे कोळकेवाडी, ता. चिपळूण) असे तिचे नाव आहे. घरगुती कारणावरून हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली. पालशेत येथील माधव सुर्वे यांच्या आंबाबागेत सुधीर रमेश पवार व सुजाता पवार हे पती-पत्नी कामाला होते. १३ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वाद इतका पराकोटीला गेला की, सुजाताने घराच्या मागील बाजूस जाऊन विषारी द्रव प्यायली. तिला प्रथम पालशेत येथील डॉ. ढेरे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. तेथून कामथे रुग्णालय व अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता १४ मे रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत पती सुधीर पवार यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनवणे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT