कोकण

जगबुडी पुलावर अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी

CD

84610
-----------
जगबुडी पुलावर अपघातात
कंटेनर चालक गंभीर जखमी
खेड, ता. १९ : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळला. या अपघातामध्ये कंटेनरचालक नदीपात्रात कोसळून गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी रात्री १०.३० वा च्या सुमारास घडला.
जगबुडी पुलावरील वळण अपघाताना निमंत्रण देणारे ठरत असून या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी जीव गमावला आहे. शनिवारी रात्री चालकाला पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकाला धडकला. या धडकेत चालक नदीपात्रात कोसळला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक पोलिस, कशेडी वाहतूक शाखेचे कर्मचारी रेस्क्यू टीम मदत ग्रुपच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नदीपात्रात कोसळलेल्या चालकाला बाहेर काढून प्रसाद गांधी यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. नव्या जगबुडी पुलावर दिवे आहेत. मात्र ते अद्याप कार्यान्वित न केल्याने अंधारातच पुलावरून वाहने हाकावी लागत असल्याने अपघातामध्ये वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Village of Widows : विधवांचे गाव ! इथे ७० टक्के महिला तरुणपणीच गमावतात पती; काय आहे मृत्युचे धक्कादायक वास्तव?

बीडमध्ये हे काय चाललंय? थाळी एकच पण जेवले 50 जण, शिवभोजन थाळीत 'डिजीटल भ्रष्टाचार'

Patanjali: रामदेव बाबांना हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

कर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात? उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी घेतली महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'माझ्याकडे दुसरा पर्याय..'

Woman Doctor Ends Life : स्वतःवर ब्लेडने वार करून डॉक्टर महिलेनं संपवलं जीवन, पतीदेखील वैद्यकीय अधिकारी; धक्कादायक कारण समोर...

SCROLL FOR NEXT