कोकण

जमिनीचे बनावट दस्तऐवज बनविणाऱ्यास मुंबईतून अटक

CD

जमिनीचे बनावट दस्तऐवज
बनविणाऱ्यास मुंबईतून अटक

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १९ ः जमिनीचे बनावट दस्तऐवज अन्य व्यक्तीच्या नावे बनवून रक्कम स्वीकारणारा फरार संशयित विनोद विवेक लाड (वय ४४, रा. आडवली भटवाडी) याला डोंबिवली-मानपाडा येथून गुरुवारी (ता.१६) ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी देवेश रत्नाकर गोवेकर (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी आचरा पोलिस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२३ ला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित लाड हा फरार होता. येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलिस हवालदार मिलिंद परब यांनी डोंबिवली मानपाडा येथून गुरुवारी शिताफितीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. लाड याला शुक्रवारी (ता.१७) न्यायालयात हजर केले असता २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT