rat20p19.jpg-
84730
विकास लांबोरे
-------------
प्रेरणादायी---लोगो
शासकीय नोकरीचे स्वप्न केले चाळीशीत पूर्ण
विकास लांबोरे यांचे यश ; खासगी नोकरी सोडून दिली स्पर्धा परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २१ ः जिद्द, चिकाटी आणि इच्छा असल्यास मार्ग सापडतो. प्रसिद्ध लोकशाहीर, गीतकार आणि केळंबे गावचे सुपुत्र विकास सखाराम लांबोरे ४० व्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून महसूल विभागात शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.
लोकशाहीर विकास लांबोरे यांनी गलेलठ्ठ पगाराची खासगी नोकरी सोडून कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवक बनण्याचे स्वप्न बाळगले होते. अखेर ते आपली धर्मपत्नी यांच्या पाठिंब्यावर यश संपादन केले आहे. विकास लांबोरे लांजा तालुक्यातील केळंबे विवली धनगरवाड्यातील रहिवासी आहेत. अतिशय दुर्गम आणि खडतर असलेला हा धनगरवाडा आज विकास लांबोरे यांच्या यशाने आनंदून गेला आहे. विकास यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीत गावातील प्राथमिक शाळेत धडे घेतल्यानंतर कुवे माध्यमिक शाळेत पुढील शिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण शिपोशी येथे झाले. वडिलांचा दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय होता. केळंबे धनगरवाड्यातून दररोज सात किलोमीटर पायी जाऊन दूध डेअरीत दूध टाकण्याचे काम करून त्यांनी शिक्षण घेतले. पदवी शिक्षणासाठी मुंबई गाठली. त्याचवेळी पार्टटाइम नोकरीही केली. विकास यांना लहानपणापासून लोककलेची आवड होती. धनगरवाड्यात शक्ती तुरा या लोककलेची परंपरा होती. विशाल लांबोरे या शाहिरांच्या जडणघडणीत विकास लांबोरे यांनी लोककला आत्मसात केली. मुंबईत या लोककलेला आधुनिक टच दिला. विकास लांबोरे यांची कोकणातील पर्यटन अनेक उत्सव परंपरा यावरील स्वरचित गीते गाजली. रिलायन्समध्ये एका चांगल्या पगारांची नोकरी होती. पण शासकीय सेवेत नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न होते. अचानक त्यांनी वर्षभरापूर्वी रिलायन्सचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ते पुणे येथे गेले. अहिल्यादेवी अभ्यासक्रमामध्ये राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी पत्नीला सांगितला. पत्नीनेही विकास यांना पाठिंबा दिला. राज्य राज्यसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात विकास लांबोरे यांनी य़स्वी केली. त्यामुळे पत्नी आणि कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांसाठी विकास लांबोरे यांची कहाणी प्रेरणादायी आहे.
--------
कोट
माझे यश माझ्या पत्नीचे आहे. पत्नीची प्रेरणा होती. गावकऱ्यांची साथ आणि आई-वडिलांच्या पुण्याईमुळे एक अतिदुर्गम भागातील एक सर्वसामान्य मुलगा शासकीय नोकरीत रुजू होत आहे. हा आनंद वेगळा आहे.
- विकास लांबोरे, केळंबे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.