कोकण

विभागीय मल्लखांब शिबिरात ३७ जणांचा सहभाग

CD

84787
-----------
मल्लखांब शिबिरात ३७ जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात आयोजित विभागीयस्तरीय मल्लखांब कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ मल्लखांबपटू सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना, चिपळूण आणि डेरवणच्या एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अकॅडमी यांच्यावतीने हे शिबिर घेण्यात आले.
प्रशिक्षण शिबिरात विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना कौशल्य सुधारण्यासाठी, छोट्या छोट्या चुका सुधारण्यासाठी, खेळासाठी लागणारी शारीरिक क्षमता कशी वाढवावी व खेळाडूंचा आहार कसा असावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर कालावधीत पुरलेला, टांगता व दोरीच्या मल्लखांबावर सकाळ व संध्याकाळच्या सत्रात सरावही घेण्यात आला. तसेच प्रात्यक्षिकासाठी लागणारा निराधार मल्लखांबाचाही खास सराव घेण्यात आला. या शिबिरासाठी जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक रणवीर सावंत, कोल्हापूर जिल्ह्याचे विशाल पाटील, सांगलीतील वैभव हवलदार व गौरव आंब्रे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या समारोपाला एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अॅकॅडमीचे संचालक श्रीकांत पराडकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुजित शेडगे, जिल्हा संघटनेचे सचिव शिव-छत्रपती पुरस्कार प्राप्त शांताराम जोशी उपस्थित होते. याप्रसंगी सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT