कोकण

रत्नागिरी, खेड, दापोली डेपोला ३५ इलेक्ट्रिक बस

CD

४४ ( पान ३ साठी )
-----------

रत्नागिरी, खेड, दापोलीला ३५ इलेक्ट्रिक बस

प्रज्ञेश बोरसे ः चार्जिंग स्टेशनला भुमिगत विद्युतवाहिन्या

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एसटी डेपोंना इलेक्ट्रिक बस लवकरच मिळणार आहेत. प्रत्येक डेपोला ३५ ते ४० इलेक्ट्रिक बसची मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या गाड्यांचे डेपोंमध्येच चार्जिंग होणार आहे. त्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांकडून डेपोपर्यंत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
रत्नागिरीतील नाचणे उपकेंद्रातून माळनाका येथील विभागीय नियंत्रक कार्यालयामागे चार्जिंग स्टेशनसाठी वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एसटींचे सुमारे ६५ हजार १६० किलोमीटरपर्यंत दरवर्षी मार्गक्रमण होते. २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार दररोज ६३८ एसटींच्या दैनंदिन फेऱ्या आहेत.

सध्या डिझेलवर चालणाऱ्या ७९४ बसेस आहेत. त्यात आता रत्नागिरी, खेड आणि दापोलीमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांची लवकरच भर पडणार आहे. या बसगाड्यांची चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होण्यासाठी आगारापर्यंत महावितरणकडून वीज वाहिन्या टाकल्या जात आहेत. रत्नागिरीतील माळनाका येथे विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या मागे कार्यशाळा आहे. या ठिकाणी डिझेल पंप आणि दुरुस्ती करण्यासाठी गॅरेज आहे. याचठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार आहे. त्यासाठी महावितरणच्या नाचणे उपकेंद्राकडून भुमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT