कोकण

भगवद्गीतेमुळे जीवन निश्चितच सुखकारक होईल

CD

१७ (टुडे ३ साठी)

- rat२१p२.jpg-
P२४M८४८९३
व्याख्यान देताना राजेंद्रप्रसाद मसुरकर.

भगवद्गीतेमुळे जीवन निश्चित सुखकारक होईल

राजेंद्रप्रसाद मसुरकर ः रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात गीतेवर प्रवचन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : सर्व परिस्थितीतून सकारात्मक पावले टाकायची असतील तर भगवद्गीता हे त्यासाठी बळ देणारे साधन आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आजही तितकीच उपयुक्त व परिणामकारक आहे. गीता हा धर्मग्रंथ फार जड नाही, कोणीही वाचू शकतो. त्याचा अर्थ काढून आपण जगलो तर जीवन निश्चितच सुखकारक होईल, असे प्रतिपादन अभ्यासक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
डॉ. श्रीकृष्ण तथा काका देशमुख परिवारातर्फे विठ्ठल मंदिरामध्ये आजच्या काळात भगवद्गीता या विषयावर आयोजित प्रवचनात मसुरकर बोलत होते. ते म्हणाले, भगवद्गीता हा भारतासह विदेशातील पंडितांच्या कुतूहलाचा व व्यासंगाचा महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी या ग्रंथाचा लोकशिक्षण व जनजागृतीसाठी उपयोग केला. गीतेचा अभ्यास करून अनेकांनी मीमांसा, भाष्य, टिप्पणी केली आहे. संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी सुरेख लिहिले आहे. महाभारतात आप्तेष्टांना मारावे लागणार या कल्पनेने अस्वस्थ झाल्यामुळे शस्त्रत्याग करून रणांगणावर बसकण मारणाऱ्या अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजे गीतेचे सार. आज विद्यार्थी, पालक, शेतकरी, नोकरदार, संसारी माणसे अर्जुनासारखी मनःस्थिती अनुभवत आहेत. गीता त्यांचे प्रबोधन करू शकेल. याकरिता गीतापठण करावे, गीता जाणून घ्यावी. गीतेच्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेऊन तिचे आचरण करण्यात लोक कमी पडत आहेत. गीतेचे पठण व अध्ययन करण्याकडे वळणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्वांत वाईट गोष्ट अशी की गीता वगैरे संस्कृत व प्राचीन ग्रंथ हे आपले नव्हेत असे मानण्याची प्रवृत्ती वाढत आहे. जी गीता ऐकून हताश अर्जुन युद्धास प्रवृत्त झाला, तीच गीती ऐकून आपण उत्साही बनत नाही.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नाली जोशी, सद्गुरू स्तवन प्रांजली विलणकर, प्रार्थना गीता रुणकर आणि गवळण अनुया बाम यांनी सादर केली. याप्रसंगी मसुरकर यांचा सन्मान करण्यात आला.
------

गीता पठणाने मनोबल प्राप्त होईल

गीता हा ग्रंथ स्वतः श्रीकृष्णाने लिहिला नाही. महाभारत या ग्रंथात व्यास महर्षींनी भीष्मपर्व या सहा क्रमांकाच्या खंडात २५ ते ४२ असे अठरा अध्याय लिहिले आहेत. त्यांना श्रीमद्भगवद्गीतापर्व संबोधून १ ते १८ असे क्रमांक दिले आहेत, हीच भगवद्गीता. गीता हे चार व्यक्तींच्या संवादांतून निर्माण झालेले सर्वांगसुंदर काव्य आहे. गीतेचा अर्थ जाणून घ्यावा व त्यानंतर दररोज तोंडपाठ म्हणावा. इतके केले तरी आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील समस्या सोडवण्यास मनोबल प्राप्त होईल, असे श्री. मसुरकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT