१६ (टूडे पान २ साठी)
---------
- rat२१p६.jpg-
P२४M८४९०८
ओळी ः देवळे (संगमेश्वर) येथे होणाऱ्या तिनसान या नाटकाचा सराव करताना कलाकार (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण
देवळेत कार्यक्रम ; शुक्रवारी ''तिनसान'' नाटक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ः देवळे (ता. संगमेश्वर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि बुध्द विहाराचे लोकार्पण करुणा ज्योती महाथेरो यांच्या हस्ते २३ मे रोजी सायंकाळी होणार आहे. या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय बौद्धमहासभा ग्राम शाखा देवळे, बौद्ध मंदिर देवळे (विहार ट्रस्ट) बौद्धजन सेवा संघ मुंबई, आम्रपाली महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ मुंबई व दीपसंदेश क्रीडा मंडळ देवळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होईल. २३ ला सकाळी ७ वाजता धम्मध्वजारोहण, ८ वाजता बुद्धमु्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक, साडेचार वाजता प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा, ५.१५ ला धम्मसेना जाहीर सत्कार व मार्गदर्शन रात्री १० वाजता निर्भिड बाणा भीम गीतांचा कार्यक्रम. २४ मे रात्री १० वाजता प्रायोगिक थिएटर्सचे अमर खामकर लिखीत तिनसान हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. या नाटकात मयुरा डोमणे, सुमेध कांबळे, श्रीनायक घगवे, श्रुती पवार, वेदांत झगडे आणि रवींद्र कांबळे आदी कलाकार अभिनय साकारणार आहेत. सुत्रधार रवींद्र कांबळे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत गुरव, नेपथ्य सुधाकर पांचाळ, प्रकाश योजना अमर खामकर, रंगभूषा नरेश पांचाळ, पार्श्वसंगीत आदित्य दत्ते, श्रेयस सकपाळ यांचे आहे. लोकार्पण सोहळ्याला रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम डी. धावडे, मुंबईतील अग्निशमन अधिकारी संतोष सावंत, संतोष आयरे आदी उपस्थित राहणार असल्याचे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी सांगितले.
----------
तिनसान नाटकाची कथा
मंत्रालयातील निवृत्त अधिकारी एका ठिकाणी झालेल्या बॉम्ब स्फोटात एका लहान मुलाला वाचवताना स्वतःच्या मुलाला वाचवू शकत नाही. पण वाचलेल्या मुलाचे ते अधिकारी स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करतात. उच्च शिक्षण देतात. पण मुलगा मोठा झाल्यावर नोकरीनिमित्त परदेशी जातो आणि मागे वळून पहात नाही. मात्र निवृत्त अधिकाऱ्याचा मित्र त्या मुलाला खरी हकिगत सांगतो अशी या तिनसान या नाटकाची कथा आहे. या कथेला विनोदी साज दिल्यामुळे हे नाटक लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.