कोकण

आंबोली सैनिक स्कूलची १०० टक्केची परंपरा कायम

CD

84934

आंबोलीतील सैनिक स्कूलची
१०० टक्केची परंपरा कायम

सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २१ ः येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या वि‌द्यार्थ्यांनी बारावीच्या (विज्ञान) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेने सलग १४ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, २२ विद्यार्थी विशेष श्रेणीत तर उर्वरित १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
शाळेतून कॅडेट अॅलेक्स सावंत याने ८६.०० टक्के गुण मिळवून प्रथम, कॅडेट अजय गावकर याने ८१.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कॅडेट सुयश कदम याने ८०.३३ टक्के गुण मिळवून तृतीय कमांक पटकावला. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. लेखी परीक्षेसह जे.ई.ई., सी.ई.टी. व एन.ई.ई.टी. परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी, नेव्ही, मर्चंट नेव्ही, बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रांत अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत, युद्ध कौशल्य, आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागर्दशन केले जाते. शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष व सचिव सुनील राऊळ तसेच संचालक श्री. जॉय डॉन्टस, श्री. शंकर गावडे, श्री शिवाजी परब व सर्व संचालक, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ, सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT