कोकण

भोसले इन्स्टिट्यूटच्या तेरा विद्यार्थ्यांना नोकरी

CD

84932

भोसले इन्स्टिट्यूटच्या
तेरा विद्यार्थ्यांना नोकरी

गोवा, माजगावातील कंपनीत संधी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली.
कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक अभियंता व ५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर, माजगाव या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सध्या आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, आता पुणे-मुंबई सोबतच गोवा व स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंत्यांची आवश्यकता भासत आहे. या अनुषंगाने कॉलेजने विविध आयटी उद्योगांशी सामंजस्य करार केलेले असून, त्यामधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिलिंद देसाई यांनी सांगितले. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! दक्षिण भारतातून मॉन्सूनची वाटचाल सुरू; जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होणार एन्ट्री?

IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

SCROLL FOR NEXT