३१ (पान ३ साठी)
-rat१९p३३.jpg -
24M84951
राजापूर ः खर्ली पात्रामध्ये लावलेल्या ‘नो पार्किंग’ फलकाभोवती पार्कींग केलेल्या गाड्या.
-----------
राजापुरात पार्किंगची समस्या जटील
सर्वसामान्यां नाहक त्रास; उपाययोजनेची गरज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ः दिवसागणिक वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि त्यातून जटील होत जाणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये शहरामध्ये गाड्यांच्या पार्किंगची समस्या अद्यापही ‘जैसे थे’ आहे.
शहरात सुयोग्य पार्किंगची व्यवस्था नसल्याने मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी चारचाकी किंवा दुचाकी पार्किंग करून ठेवल्या जातात. यामध्ये जवाहरचौक परीसर, शहरातील मुख्य रस्त्याचा जवाहरचौक ते नगरवाचनालय, बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा, बाजारपेठेमध्ये जाणारे छोटेरस्ते येथील भागांचा यामध्ये समावेश आहे. पार्किंग व्यवस्थेअभावी वाहनचालक काहीवेळा नो पार्किंगचे फलक लावलेल्याच ठिकाणी गाड्या पार्क करून ठेवतात. त्याच्यातून अनेकवेळा रहदारीच्या या भागांमध्ये वाहतूक कोंडी होवून सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने वाहन चालकांकडून कोदवली नदीच्या खर्लीपात्रातील मोकळ्या जागेमध्ये गाड्या पार्क करण्याला अधिक पसंती देतात. खर्ली पात्रामध्ये मोठ्याप्रमाणात तीनचाकी आणि चारचाकी गाड्या पार्कींग करून ठेवलेल्या असतात.
------------
धोका असूनही नदीपात्रातच पार्किंग
पंधरा दिवसांपूर्वी अचानक आलेल्या भरतीमध्ये कोदवली नदीचे पात्र पाण्याने भरून गेले होते. अचानक वाढलेल्या या पाण्याचा नदीपात्रामध्ये पार्किंग करून ठेवलेल्या गाड्यांना वेढा पडून त्या वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. भविष्यामध्येही हा धोका उद्भवण्याची शक्यता ओळखून नदीपात्रामध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने गाड्या पार्कींग करून ठेवू नयेत असा फलक नगर पालिका प्रशासनाने लावला आहे. मात्र, शहरामध्ये मोकळी आणि सोयीची पार्कींगसाठी जागा नसल्याने पाण्याचा वेढा पडण्याचा संभाव्य धोका असूनही वाहन चालकांकडून खर्ली नदीपात्रामध्ये गाड्या पार्कींग करून ठेवल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.