९ (टूडे १ साठी, संक्षिप्त)
‘आरटीओ’तर्फे उद्या
मार्गदर्शन शिबिर
चिपळूण : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व माई हुंडाई चिपळूण आणि श्रृतिका मोटर ट्रेनिंग स्कूल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २३) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ‘रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्रॅम’ हा उपयुक्त माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
माई हुंडाई चिपळूण शिवाजीनगर खेर्डी एमआयडीसी येथे हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी रस्ते अपघात व रस्त्यावरील सुरक्षा या विषयावर असिस्टंट इन्स्पेक्टर प्रतीक चोपडे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मोटार वाहन कायदा व कलम या विषयांवर सत्यवान पाटील, रस्त्याची भाषा (चिन्हे) यावर संचालक श्रृतिका मोटर ट्रेनिंग स्कूलचे महेश पंडित, वाहनातील नवीन टेक्नॉलॉजी या विषयावर मयुरेश जोशी ट्रेनर माई हुंडाई, वाहनाचे बेसिक मेंटनन्स या विषयावर फहीम मुल्ला मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील वाहनचालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माई हुंडाईतर्फे करण्यात आले आहे.
----------
कोकण रेल्वे मार्गावर
शुक्रवारी मेगा ब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर २४ मे रोजी सावर्डे ते भोके दरम्यान अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोके दरम्यान सकाळी ७ ते ९.३० असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे मंगला एक्स्प्रेस मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ५० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी गाडी २४ मे रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास १० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
-------
विल्येत आज रक्तदान शिबिर
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी स्थानिक व मुंबई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, दानशूर मानका आप्पा कांबळे समिती, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि विल्ये स्टार क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २२) सकाळी ९ वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
‘पैसा फंड’चा
निकाल १०० टक्के
संगमेश्वर ः व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलचा बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७, तर कला शाखेचा निकाल ९३ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.